एक्स्प्लोर

Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?

Devendra Fadnavis : पालकमंत्रिपदासाठी महायुतीतील तीनही पक्ष इच्छुक असल्याची चर्चा आहे. येत्या काळात गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार आहे. 

गडचिरोली : महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख, ती ओळख बदलण्याचा मानस देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला. त्यासाठी गडचिरोलीचं पालकमंत्रिपद आपल्याकडेच राहील अशी आशाही त्यांनी बोलून दाखवली. या पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही इच्छा दर्शवली असल्याचं कळतंय. पालकमंत्री कोणीही झालं तरी गडचिरोलीला अच्छे दिन येतील का? नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराने मागे पडलेला हा भाग नवी स्वप्न पाहातोय ती पूर्ण होतील का? हे पाहावं लागेल. 

गडचिरोली म्हणजे नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख. गडचिरोली म्हणजे मागास, अतिदुर्गम, अविकसित भाग अशीही ओळख. गडचिरोली म्हणजे शिक्षा म्हणून बदली करण्याची जागा अशीही ओळख. मात्र आता ही ओळख हळुहळू बदलू लागली आहे. नक्षलवाद बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. 

गडचिरोलीत मोठे उद्योग येणार

गडचिरोलीत आता लोह खनिजावर आधारित मोठ मोठे प्रकल्प सुरु होत आहेत. हजारो कोटींची गुंतवणूक येत आहे. रोजगाराच्या संधी सुद्धा वाढणार आहेत. अशा कात टाकू पाहणाऱ्या गडचिरोलीचं पालकमंत्रीपद चर्चेत आहे. त्यावरुन रस्सीखेच सुद्धा सुरु असल्याचीही चर्चा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा आपली भूमिका मांडलीय. एकनाथ शिंदे, अजित दादांसोबत चर्चा करून पालकमंत्री ठरवू असं त्यांनी सांगितलं. 

गडचिरोलीचे पालकमंत्रिपद चर्चेत

एक काळ असा होता की गडचिरोलीचं पालकमंत्री व्हायला कोणी तयार नसायचं. पण माजी गृहमंत्री आर आर आबांनी ही प्रथा मोडली आणि गडचिरोलीच्या विकासात मन लावून काम करुन दाखवलं. नंतर मविआ सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हे पद चर्चेत आणलं. तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनीही पालकमंत्री म्हणून मेहनत घेतली. 

नक्षली हिंसाचारामुळे इथे नवा प्रकल्प, गुंतवणूक, रोजगार, विकासकामं कठीण होतं आता 'सुरजागड इस्पात' मध्ये 10 हजार कोटींची गुंतवणूक येत आहे. सात हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मिती या प्रकल्पामुळे होणार आहे. गडचिरोली लवकरच स्टील उत्पादनाचे महत्वाचं केंद्र बनतंय. 

आतापर्यंत महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख होती, पण आता गडचिरोली शेवटचा नाहीतर पहिला जिल्हा असेल असा आशावाद फडणवीसांनी बोलून दाखवला आहे. पालकमंत्री कोणीही झालं तरी गडचिरोलीला अच्छे दिन येतील अशी आशा.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 25 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सManikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?Zero Hour Devendra Fadnavis Politics : देवेंद्र फडणवीसांना कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायचंय?Zero Hour : चाणाक्ष नेते,उत्तम वक्ते,लाडके राज्यकर्ते; Atal Bihari Vajpayee सारखा नेता होणे नाही...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
Embed widget