एक्स्प्लोर

Nashik News : अवजड वाहतुकीचा बळी! ट्रकची दुचाकीला धडक, नाशिकमध्ये दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

Nashik News : नाशिकमध्ये अवजड ट्रकने दुचाकीस्वार महिलेस चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

Nashik News : नाशिक (Nashik) शहरात अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गजबजलेल्या परिसरात वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघात होत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर अनेकदा अवजड वाहने दुचाकी धारकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. अशीच एक घटना इंदिरानगर परिसरात घडली आहे. अवजड ट्रकने दुचाकीस्वार महिलेस चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

नाशिक शहरात (Nashik City) अपघातांच्या (Accident) घटना नित्याच्या झालेल्या दिसून येतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) वारंवार जनजागृती होत असताना अपघाताच्या घटनांना निमंत्रण दिले जात आहे. अनेकदा शहरातील विविध भागातून अवजड वाहतूक बंद असताना देखील वाहतूक केली जात असल्याने वाहतूक कोंडीसह अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा प्रकारे निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नाशिक शहरातील वडाळा गावातील गॅस गोदाम अवजड ट्र्कने (Truck Accident) चिरडल्याने दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला असून परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली अवजड वाहतूक आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल केला आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरून सोमवारी (15 मे) दुपारी 12 वाजेच्या सुमारास वडाळा गावातून मुंबई महामार्गाकडे अवजड ट्रक भरधाव वेगाने गॅस गोडाऊन लगतच्या रस्त्यावरुन जात असताना दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार आम्रपाली डेंगळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले. घटनास्थळी जमलेली गर्दी पोलिसांनी पांगवली. संतप्त नागरिकांनी घटनास्थळी जमा होऊन पोलिस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे. वडाळा पाथर्डी रोडवर अवजड वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिक, विद्याथ्यांसह नागरिकांना रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. मात्र बेशिस्तपणे आणि भरधाव वेगाने जाणाऱ्या अवजड वाहनावर नाशिक शहर वाहतूक पोलिसांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

निवेदन, आंदोलने झाली, मात्र..... 

नाशिक शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सुमारे तीन वर्षापूर्वी सर्कल द्वारका सर्कल येथे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी श्री श्री रविशंकर मार्गावरुन वडाळागाव, इंदिरानगर मार्गे पाथर्डी फाटा या रस्त्यावरुन प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्यावर कंटेनर, टँकर, ट्रेलरसारखे अवजड वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असून अशाप्रकारच्या अपघातामध्ये नागरिकता जीव गमवावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच अवघड वाहतूक बंद करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. उपोषणही करण्यात आले होते. तरीही अद्याप अवजड वाहतूक बंद करण्यात आली नाही. त्यामुळे आज एका महिलेला प्राण गमवावे लागले आहे. आणखी किती जीव गेल्यानंतर अवजड वाहतूक बंद होणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore : भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
Jaykumar Gore nude photo: मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव रमलाच नाही; प्रवास 'झेपेना' म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव रमलाच नाही; प्रवास 'झेपेना' म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली!
Yavatmal Crime News : डिलिव्हरी बॉयने 'सर' न म्हटल्याने ठाणेदाराची भाईगिरी; शिव्यांची लाखोलीसह बेदम मारहाण,यवतमाळमध्ये संताप! 
डिलिव्हरी बॉयने 'सर' न म्हटल्याने ठाणेदाराची भाईगिरी; शिव्यांची लाखोलीसह बेदम मारहाण,यवतमाळमध्ये संताप! 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jaykumar Gore Photo Controversy : जयकुमार गोरेंनी महिलेला पाठवले नग्न फोटो? प्रकरणाची A टू Z माहितीBeed Dhananjay Munde : मुंडे मुंगीही मारु शकत नाहीत, नाथ्रा ग्रामस्थांना राजीनाम्याविषयी काय वाटतं?Santosh Deshmukh Case: Walmik Karadने डिलीट केलेला डेटा SITकडून रिकव्हर,कराडविरोधातले पुरावे माझा'वरPune Swargate ST Bus Depo : स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणाचं आरोपपत्र 15 दिवसांत दाखल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaykumar Gore : भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
Jaykumar Gore nude photo: मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव रमलाच नाही; प्रवास 'झेपेना' म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव रमलाच नाही; प्रवास 'झेपेना' म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली!
Yavatmal Crime News : डिलिव्हरी बॉयने 'सर' न म्हटल्याने ठाणेदाराची भाईगिरी; शिव्यांची लाखोलीसह बेदम मारहाण,यवतमाळमध्ये संताप! 
डिलिव्हरी बॉयने 'सर' न म्हटल्याने ठाणेदाराची भाईगिरी; शिव्यांची लाखोलीसह बेदम मारहाण,यवतमाळमध्ये संताप! 
Sanjay Raut Samna: फडणवीस-अजितदादा धनंजय मुंडेंना म्हणाले,
फडणवीस-अजितदादा धनंजय मुंडेंना म्हणाले, "हवा गरम आहे, मामला थंड होईपर्यंत आराम करा नंतर पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ"; 'सामना'च्या अग्रलेखातील इनसाईड स्टोरी
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी गोव्यात थाटामाटात लग्न, दोन दिवसांपूर्वी टीव्ही रिमोटवरून वाद; महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरनं गळ्याला दोरी लावली
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी गोव्यात थाटामाटात लग्न, दोन दिवसांपूर्वी टीव्ही रिमोटवरून वाद; महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरनं गळ्याला दोरी लावली,
कांदे खाण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
कांदे खाण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची चीनसह भारतावर परस्पर कराची तलवार, अंमलबजावणीची तारीख सांगितली
भारत अन् चीनवर परस्पर कर लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, अंमलबजावणीची तारीख सांगितली
Embed widget