Santosh Deshmukh Case: Walmik Karadने डिलीट केलेला डेटा SITकडून रिकव्हर,कराडविरोधातले पुरावे माझा'वर
Santosh Deshmukh Case: Walmik Karadने डिलीट केलेला डेटा SITकडून रिकव्हर,कराडविरोधातले पुरावे माझा'वर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी माहिती...
आरोपींविरोधात दाखल झालेल्या दोषारोपपत्रातले काही महत्त्वाचे मुद्दे एबीपी माझाच्या हाती लागलेत. वाल्मिक कराडच्या अडचणी वाढवणारी ही माहिती धक्कादायक आहे.. कराडने हत्या प्रकरणानंतर आपल्या तीन आयफोनमधील डेटा डिलीट केला. हा डिलीट झालेला डेटा एसआयटीने रिकव्हर केला. आवादा कंपनीकडे खंडणी मागतानाचे काही व्हिडीओ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चित्रीत केले होते. या चित्रीत झालेल्या व्हिडीओत सुदर्शन घुले कंपनीकडे स्पष्टपणे २ कोटींची खंडणी मागताना दिसतोय. त्यात त्याने कराडचं नाव घेत खंडणी मागितल्याचं चित्रीत झालंय. कराडने डिलीट केलेला हा डेटा एसआयटीने रिकव्हर केलाय. कराडविरोधात हा सबळ पुरावा ठरू शकतो. कराडची महाराष्ट्रभर कोट्यवधींची संपत्ती आहे. ही संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीने अर्ज केलाय.


















