Nashik News : 'शिंदे कंपनीच्या बंडामुळे राज्यात हिंदूंचं सरकार', नाशिकमध्ये भाजपकडून फटाक्यांची आतिषबाजी
Nashik News : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये (Nashik) भाजप पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडत जल्लोष करण्यात आला.

Nashik News : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. एकमेकांना पेढे भरवत, ढोल ताशांच्या गजरात नाचत नव्या सरकारचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.
राज्यातील दहा दिवसांच्या सत्तानाट्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेनेचाच मुख्यमंत्री मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्या नंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र सत्ता स्थापनेचा दावा केला आणि काल राज्यपालांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
दरम्यान कालच्या शपथविधीनंतर आज संपूर्ण महाराष्ट्रात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, नाशिकमध्ये देखील आज भाजप कार्यालयात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकच ठेका धरला होता तर महिला पदाधिकारी यांनी फुगडी खेळून हा आनंदोत्सव साजरा केल्याचे पाहायला मिळाले. तसेच एकमेकांना पेढे भरून भाजप आणि देवेंद्र फडवणीस यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे म्हणाले कि, जे महाविकास आघाडी सरकार करू शकले नाही ते भाजपने करून दाखवलं आहे. भाजपने शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले आहे. आणि हिंदुत्वाची लाज राखली आहे. देवेंद्र फडणवीस हे नाराज नसून मोठ्या मनाने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. इतका मोठा निर्णय घ्यायला मनही मोठं लागतं. खऱ्या अर्थाने अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला. मात्र शिवसेनेच्या आमदारांना घराणेशाही काही पटत नव्हती शेवटी त्यांनी बंड केले. आणि आज भाजपमुळे एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला आहे. तसेच शिंदेच्या कंपनीच्या बंडामुळे राज्यात नाव सरकार आलं.
ईडीच्या कारवाया होतीलच!
सत्ता स्थापन झाल्यानंतर आताच्या भाजपामध्ये व शिंदे गटातील काही आमदारांवर ईडीची कारवाई सुरु आहे. यामध्ये प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, संजय राठोड यांच्या चौकशी होईलच. जे चौकशीमध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल, अशी माहिती पालवे यांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
