Kalaram Mandir : उद्या सायंकाळी उद्धव ठाकरेंच्या हस्ते काळाराम मंदिरात महाआरती; मनसेने घेतला मोठा निर्णय
Nashik News : सोमवारी उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरात दर्शन घेऊन महाआरती करणार आहेत. यावर नाशिक मनसेने मोठा निर्णय घेतला आहे.
Kalaram Mandir नाशिक : सध्या अयोध्यानगरीसह संपूर्ण देश रामलल्लाच्या (Ram Mandir) प्रतीक्षेत आहे. राम मंदिर लोकार्पणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. अयोध्येत राम मंदिर लोकार्पणाची (Ram Mandir Inaguration) धूम असताना नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन (Shivsena UBT State level convention) होणार आहे. सोमवारी (दि. 22) उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरात दर्शन घेऊन महाआरती करणार आहेत. मात्र त्या आधीच मनसेकडून सोमवारी सकाळी काळाराम मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये (Nashik News) 22 जानेवारीला दाखल होणार आहेत. 12 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेतले होते. त्याच मंदिरात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दर्शन घेणार असून ते आरतीही करणार आहेत. आता मनसेकडून (MNS) देखील काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) आरतीची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.
मनसेकडून महाआरती, 51 हजार मोतीचूर लाडूंचे वाटप
नाशिक मनसेच्या वतीने सकाळी 9 वाजता काळाराम मंदिरात महाआरतीचे आयोजन केले गेले आहे. यासोबतच 51 हजार मोतीचूर लाडूंचा काळारामाला नेवैद्य दाखवत प्रसाद म्हणून या लाडूंचे शहरभरात वाटप केले जाणार आहे.
मनसेचे कार्यालय झाले लाडूमय
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त नाशिक मनसेकडून शहरात मोतीचूर लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे लाडू बनवत आहे. त्यामुळे मनसेचे नाशिकमधील कार्यालय भगवेमय झाल्याचे चित्र आहे.
'आमचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व' - सुदाम कोंबडे
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्याचा दिवस राज ठाकरेंच्या आदेशानूसार आनंदोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे, आमचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे, असा टोला मनसेचे नाशिक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.
23 जानेवारीला उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार
23 तारखेला बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने अभिवादन करून नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 10 ते 2 वाजेपर्यंत पक्षाचे प्रमुख वक्ते बोलणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होईल. सायंकाळी 7 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. सुरुवातीला जागरण गोंधळाचा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला आहे. नाशिकला उद्धव ठाकरेंची तोफ नक्की कुणावर धडाडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
आणखी वाचा