एक्स्प्लोर

Nashik News : 'मित्र वणव्यांमध्ये गारव्यासारखा', नाशिकमधील पाच मित्रांची सक्सेस स्टोरी, एकत्र अभ्यास केला अन् घवघवीत यश मिळालं!

Nashik Success Story : नाशिकमधील (Nashik) पाच मित्रांनी सोबत राहून, एकत्र अभ्यास करून एकाच वर्षी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून एक नव्हे दोन-दोन पोस्टवर आपली मोहोर उमटवली आहे. 

नाशिक : 'वाट चुकणार नाही, जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही, जीवनभर तुझी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यांमध्ये गारव्यासारखा' या कवितेच्या ओळी आजही अनेक मित्रांच्या ओठांवर असतात. खऱ्या अर्थाने माणसाच्या आयुष्यात मित्रांचे स्थान अढळ असते. याच उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकमधील (Nashik) हे पाच मित्र. यात विशेष काय, या पाच मित्रांनी सोबत राहून, एकत्र अभ्यास करून एकाच वर्षी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून एक नव्हे दोन दोन पोस्टवर आपली मोहोर उमटवली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) असंख्य विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षांच्या (Compattaive Exam) माध्यमातून घवघवीत यश संपादन करताना पाहायला मिळत आहे. त्यातच या पाच मित्रांच्या घवघवीत यशाने मैत्रीचा नवा आदर्श घालून दिला आहे. असं म्हणतात की चांगल्या मित्रांची सोबत आलेला आयुष्यातून कोणत्याही संकटावर मात करायला शिकवते. नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून एकत्र आलेल्या आकाश दिपक बोढारे, अनिल भिमराव बत्तीशे, राहुल नानासाहेब पवार, राकेश कैलास निकम आणि शुभम नंदकुमार निकम या मित्रांनी मैत्री काय असते, काय करू शकते, हे या यशातून दाखवून दिले आहे. या पाचही मित्रांनी नाशिकमधील एका अभ्यासिकेत दिवस रात्र एक करून, एकमेकांना मार्गदर्शन करून आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून यश संपादन केले आहे. या पाच मित्रांच्या कष्टाची ही सक्सेस स्टोरी (MPSC Success Story) वाचलीच पाहिजे... 

आकाश दिपक बोढारे हा चांदवड (Chandwad) तालुक्यातील शिंदे भयाळे येथील असून त्याचे माध्यमिक शिक्षण शिंदे येथीलच जनता विद्यालयात झाले आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण हे नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातून झाले आहे. आकाश याने 2018 पासून स्पर्धा परीक्षांची तयारीची सुरुवात केली. या दरम्यान त्याने अनेक परीक्षा दिल्या, ज्यात तो पूर्व परीक्षा तर कधी मेन्स उत्तीर्ण होत असे, परंतु काही ना काही कारणास्तव यश पदरात पडत नसायचे. मात्र यंदा झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. आकाशने आता आकाशाला गवसणी घातली असून राज्यकर निरीक्षक आणि मंत्रालय क्लर्क अशा दोन जागांवर त्याची निवड झाल्याने सर्वच स्तरावर त्याचे कौतुक होत आहे. तसेच अनिल भिमराव बत्तीशे हा देखील आकाश बोढारेच्या गावचाच असून अनिलने देखील त्याचे माध्यमिक शिक्षण शिंदे येथीलच जनता विद्यालयात पूणर केले आहे. पदवीचे शिक्षण हे नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातून झाले आहे. अनिल आणि आकाश या दोघांनी सोबतच अभ्यासाला सुरवात केली. विशेष म्हणजे अनिलने देखील दोन परीक्षा उत्तीर्ण केल्या असून आता तो पोलीस उपनिरीक्षक किंवा मंत्रालय क्लर्क या दोन पोस्टपैकी एकाची निवड करणार आहे. 

या पाच मित्रांपैकी तिसरा राहुल नानासाहेब पवार हा नाशिक जिल्ह्यातील निफाड (Niphad) तालुक्यातील करंजगाव येथील आहे. राहुलचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा करंजगाव येथे झाले असून माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय करंजगाव येथून पूर्ण केले आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण सायखेडा येथील के. के. वाघ येथून पूर्ण केले आहे. राहुलने अभ्यासाची सुरवात दोन वर्षांपूर्वी केली होती. सातत्य, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर राहुलने देखील दोन परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोगाच्या परीक्षेत सलग दोन वर्षे 2021 आणि 2023 मध्ये मंत्रालय मुंबई येथे निवड झाली आहे. राहुलच्या कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून खूप कौतुक होत आहे. 

तसेच राकेश कैलास निकम आणि शुभम नंदकुमार निकम हे दोन मित्र दिंडोरी (Dindori) तालुक्यातील मोहाडी गावातील रहिवासी आहे. या दोघांचे शिक्षण के.आर.टी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मोहाडी येथे झाले असून ओझर येथील मराठा विद्या प्रसारक समाज कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. यातील राकेशने देखील दोन पदांची परीक्षा उत्तीर्ण झाला असून मुंबई मंत्रालयात क्लर्क आणि कर सहाय्यक पदासाठी त्याची निवड झाली आहे. तर शुभम नंदकुमार निकम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मंत्रालय क्लर्क म्हणून निवड झाली आहे. या पाचही मित्रांवर कौतुकाचा वर्षाव होत असून मित्र सोबत असले तर माणूस कोणत्याही संकटाचा अडथळा यशस्वी पार करू शकतो याचा आदर्श या मित्रांनी घालून दिला आहे. 

पाचही मित्रांचे आठवणींचे दिवस 

साधारण 2018 पासून आम्ही पाचही मित्र अभ्यास करत आलो आहोत. मात्र मध्यंतरी अचानक कोरोनाने हाहाकार माजवला. यामुळे सर्वच ज्याच्या त्याच्या घरी गेलो. 2021 वर्षे जसजसं संपत होत तसतसा कोरोनाचा प्रभावही कमी झाला आणि आम्ही सर्व मित्रांनी अभ्यासासाठी पुन्हा नाशिक गाठले आणि गंगापूर रोडवर अभ्यासिकेत पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. सर्व मित्रांना सोबत घेऊन अभ्यास करत होतो, एकमेकांच्या अभ्यासातील अडीअडचणी शंका सर्वजण सोबत बसून सोडवत होतो. त्याचाच फायदा आम्हाला 2022 आणि 2023 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झाला. परीक्षेनंतर कौशल्य चाचणीसाठी पात्र झाल्यावर अनेकांचे सहकार्य लाभले, अवघड समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत आम्ही पाचही मित्र वेगवेगळ्या पदांवर उत्तीर्ण झालो. आम्हाला विश्वास होताच, तो सार्थ ठरविण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली. आज आम्ही पाच मित्र वेगवगेळ्या पोस्टवर लवकरच रुजू होणार आहोत. या निमित्ताने आपल्या आयुष्यात किती महत्वाचे असते, हे आम्ही अनुभवातून शिकलो.  

इतर महत्वाची बातमी : 

Nashik Success Story : क्लास न लावता सेल्फ स्टडी केला अन् यश पदरात पडलं, नाशिक सिन्नर येथील शेतकरी कुटुंबातील ज्योतीची सक्सेस स्टोरी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget