MPSC Success Story : कुठलाही क्लास न लावता निफाडची गृहिणी बनली क्लास टू अधिकारी; संसार सांभाळत मिळवलं यश!
Nashik News : कोणताही क्लास न लावता निफाडच्या वंदना गायकवाड (Vandana Gaikawad) यांनी एमपीएसी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
नाशिक : आजकाल अधिकारी होण्यासाठी लाखो मुलं जीवाचं रान करत असतात. कुटूंबियांपासून दूर राहुन दिवस रात्र एक करत मेहनत घेत असतात. काहीजण तर हजारो रुपयांची फी भरून क्लास लावून स्पर्धा परीक्षा (MPSC Exam) देत असतात. तर काहीजण कोणताही क्लास न ना लावता यशाला गवसणी घालत असतात. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावं तेवढं कमी असतं, अशीच ग्रामीण भागातील आलेली, कोणताही क्लास न लावता अटकेपार झेंडा लावणारी निफाडची वंदना गायकवाड (Vandana Gaikawad) अधिकारी झाली आहे.
सध्याच्या स्पर्धा परीक्षेच्या (MPSC) माध्यमातून अनेकजण आपले नशीब अजमावत असतात. लाखो विद्यार्थी यासाठी प्रयत्न करत असून दरवर्षीं काही विद्यार्थ्यांना यात यश मिळत असते. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी काही जण तर मोठं मोठ्या क्लासेस लावतात. मात्र यात काही विद्यार्थी असेही आहेत, ते कोणताही क्लास न लावता अधिकारी झाले. या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नाशिकच्या (Nashik) निफाड तालुक्यातील वंदना शिंदे गायकवाड यांनी एमपीएससीत यश मिळवले आहे. गायकवाड या ओझर मिग (Ojhar Mig) येथील शेतकरी अशोक शिंदे यांच्या कन्या असून तालुक्यातील शिरवाडे येथील त्यांचे गायकवाड कुटुंबात त्यांचे सासर आहे. लग्नानंतर सासरची जबाबदारी अंगावर आल्यानंतर मुलींना शिक्षण करणे अवघड होत असते, असे म्हटले जाते. परंतु जर आपली आवड असली आणि इच्छा असली तर सर्व काही शक्य होते. कोणतेही समस्या अडचण आली तरी आपल्याला यश मिळते. याचे प्रचिती आपल्याला वंदना शिंदे गायकवाड यांच्या यशातून दिसून येते.
वंदना गायकवाड यांनी संसाराचा गाडा यशस्वीपणे सांभाळत, नोकरी करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. यंदाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, राजपत्रित -वर्ग 2, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र शासन पदी वंदना यांनी उत्तीर्ण होत माहेर अन सासरचे नाव उज्वल केले आहे. नोकरी व घर कामातून वेळ काढून वंदना यांनी परीक्षेत यश संपादन केल्यामुळे त्यांचे सर्वजण कौतुक करत आहेत. माहेर शिंदे अन सासर गायकवाड परिवारात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. तसेच आजूबाजूच्या महिलांसाठी देखील त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
पतीची साथ, केली स्पर्धा परीक्षेवर मात...
वंदनाचे प्राथमिक शिक्षण ओझर येथील अभिनव बाल विकास मंदिर येथे तर माध्यमिक शिक्षण माधवराव बोरस्ते विद्यालयात झाले. नाशिक येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये पदविका तर अमरावती येथिल शासकीय महाविद्यालयात 2015 मध्ये पदवी प्राप्त केली. वंदनाला सुरुवातीपासून अभ्यासाची आवड होती. त्यानुसार त्यांनी घरचा संसार सांभाळत एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.लग्नानंतर ही तिने परीक्षेची तयारी सोडली नाही. या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात वंदना यांना पती अमोल यांची देखील मोलाची साथ मिळाली. अमोल हे देखील उच्चशिक्षित असून केएसबी कंपनीमध्ये कार्यरत आहेत. वंदना यांनी या पूर्वीदेखील त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली होती. मात्र त्यात तिला यश मिळाले नाही. तरी ही त्यांनी खचून न जाता आपले प्रयत्न सुरूच ठेवले. आणि ३१ ऑगस्ट रोजी लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करत कुटूंबियांना सुखद धक्का दिला.
इतर महत्वाची बातमी :