एक्स्प्लोर

PM kisaan Yojna : पीएम किसान योजनेसाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे, अशी करा ऑनलाइन KYC

जिल्ह्यातील सर्व सुविधा केंद्र सणासुदी व सुट्टीच्या दिवसातही 2 दिवस सुरू राहतील. केवळ 15 रुपयांमध्ये शेतकऱ्यांना KYC करता येईल. कोणीही या लाभापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

नागपूर:  नागपूर जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी उद्या शनिवार व रविवार या दोन दिवसात पीएम किसान (PM Kisaan) सन्मान निधीच्या संदर्भातील आपली माहिती एक तर स्वतः किंवा सुविधा केंद्रांमधून भरून सादर करण्याचे आवाहन नागपूर जिल्हा प्रशासनाने केले आहे. दोन्ही दिवस जिल्ह्यातील महसूल यंत्रणा यासाठी कार्यरत असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील किसान सन्माननिधीमध्ये शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरवले आहे.या संदर्भात आज जिल्हाधिकारी (Nagpur Collector) डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी (CEO) अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

सुट्टीच्या दिवशीही सुविधा केंद्र सुरु

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने पात्र शेतकऱ्यांनी केवायसी (KYC) भरण्याचे काम सुरू आहे. मात्र या कामात एकीकडे नरखेड ने 72 टक्के काम केले असले, तरी नागपूर ग्रामीणमध्ये केवळ 32 टक्के काम झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याची सरासरी 63 टक्के असून 100% केवायसी चे काम पूर्ण करण्याबाबत सर्व तहसीलदार व महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे. ज्या ज्या ठिकाणी सुविधा केंद्र आहेत ते सर्व सुविधा केंद्र सणासुदीच्या व सुट्टीच्या दिवसातही दोन दिवस सुरू राहतील. केवळ पंधरा रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आपली माहिती भरता येणार आहे. त्यामुळे कोणीही या लाभापासून वंचित राहू नये असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

7 सप्टेंबरपर्यंत मुदत

पीएम किसान सन्मान निधीच्या ऑनलाईन केवायसीची (Online KYC) मुदत आता 7 सप्टेंबर 2022 पर्यंत करण्यात वाढविण्यात आली आहे. तथापि, जिल्ह्यात पुढील दोन दिवसातच हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन केवायसी केल्यास त्यांच्या खात्यात सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. ऑनलाईन केवायसी केले नाही तर सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. सदर योजना ओटीपीवर आधारित असून लाभार्थी शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक पीएम किसानचे वेबपोर्टल किंवा जवळच्या कॉमन सर्विस सेंटरशी सलग्न असावा.

अशी करा ऑनलाइन KYC

ओटीपी मोड (मोबाईलद्वारे / संगणकाद्वारे) : पीएम किसानच्या अधिकृत वेब पेजला https://pmkisan.gov.in/ भेट द्या. वेब पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ई-केवायसी पर्यायाला क्लिक करा. स्वतःचा आधारकार्ड क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून सर्च करा. आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका आणि क्लिक करा. ओटीपी आल्यानंतर संबंधित जागेवर ओटीपी भरा व सबमीट करा. बायोमेट्रीक मोड (महा ई सेवा केंद्रातून) : नजीकच्या नागरी सेवा केंद्रावर (सीएससी) जाऊन प्रक्रिया करता येईल. तसेच ई-सेवा केंद्रावर जातांना आपल्या आधारकार्डची झेरॉक्स सोबत घेऊन जा. वरीलप्रमाणे ई – केवायसी पूर्ण करा आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Politics : उपराजधानीत मनसे देणार शिवसेनेला पर्याय! 13 ला राज ठाकरे नागपुरात; नव्या युतीचे संकेत

Nitin Gadkari : ज्येष्ठ आणि दिव्यांगाना तीर्थ क्षेत्र दर्शनासाठी नि:शुल्क ई-बस सेवा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानियाAkola : अकोल्याच्या बाळापूरात क्षारयुक्त पाणी प्यावं लागत असल्यानं शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget