Nagpur Politics : उपराजधानीत मनसे देणार शिवसेनेला पर्याय! 13 ला राज ठाकरे नागपुरात; नव्या युतीचे संकेत
वर्षानुवर्षांपासून चिटकून असलेल्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची गच्छंती केली जाणार असून काही आक्रमक तसेच अॅक्टिव्ह कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी सोपविली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
नागपूरः राज्यातील नाट्यमय सत्तांतर घडामोडीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) मुंबई-पुण्यासह नागपूर तसेच विदर्भात (Vidarbha) शिवसेनेला पर्याय उभा करण्यासाठी मोठा विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहे. याकरिता स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) 13 सप्टेंबरला नागपूर येथे येणार असल्याची माहिती आहे.
शिवसेनेला फोडल्यानंतर त्यांचा मतदार सहजासहजी भाजपला (Bharatiya Janata Party) मते देणार नाही. त्याला पर्याय म्हणून राज ठाकरे यांची सेना उभी केली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये मनसेचा बऱ्यापैकी दबदबा आहे. नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) मनसेची सत्तासुद्धा होती. मात्र विदर्भाकडे सुरुवातीपासूनच मनसेचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अनेकजण पक्ष सोडून गेले. पक्षही विदर्भात रसतळाला गेला. विदर्भात शिवसेनेची व्होट बँक (Shivsena Vote Bank) असल्याने ती आपल्याकडे वळविण्यासाठी पुन्हा एकदा मनसेला उभारी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
याकरिता वर्षानुवर्षांपासून चिटकून असलेल्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची गच्छंती केली जाणार असून काही आक्रमक तसेच अॅक्टिव्ह कार्यकर्त्यांवर (Active Supporters) मोठी जबाबदारी सोपविली जाणार आहे. नाराज होऊन बाहेर पडलेल्या काही जुन्या पदाधिकाऱ्यांनाही पुन्हा बोलावले जात असून याकरिता एक चमू कामाला लावण्यात आली आहे.
राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटी-गाठी वाढल्या
राज्यातील सत्तांतरानंतर राज ठाकरेही सक्रिय झाले असून भाजपचे अनेक मोठे नेत्यांच्या भेटी-गाठी घेणे त्यांनी सुरु केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क वाढल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आहे.
अविनाश जाधव यांच्यावर जबाबदारी
राज ठाकरे यांचे विश्वासू अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यावर विदर्भातील मनसेला सक्रिय करण्याची जबाबदारी सोपविली आहे. ते काही आपल्या सहकाऱ्यांना घेऊन 10 सप्टेंबरला नागपूरमध्ये येत आहेत. या दौऱ्यात ते काही खास लोकांच्या गाठीभेटी घेणार आहेत. विदर्भातील राजकीय परिस्थिती, संघटना, कार्यकर्त्यांचा अहवाल (Report Card of MNS in Vidarbha) तयार करुन ते पक्षाकडे सादर करतील. त्यानंतर राज ठाकरे यांचा 13 सप्टेंबरचा दौरा निश्चित केला जाणार असल्याचे विश्वसनीय माहिती आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या