नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'गुड न्यूज', भारताच्या तिजोरीत आले 1.96 लाख कोटी रुपये
GST Collection : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'गुड न्यूज' आली आहे. जीएसटी कलेक्शनमधून सरकारच्या तिजोरीत 1.96 लाख कोटी रुपये आले आहेत.
GST Collection : आजपासून (1 एप्रिल 2025) पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. यासोबतच सरकारसाठीही एक आनंदाची बातमी आली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (FY25) च्या चौथ्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळं मार्चमध्ये जीएसटी संकलन (GST Collection) 9.9 टक्क्यांनी वाढले असून ते 1.96 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
एकूण जीएसटी महसूल 12,300 कोटी रुपये
केंद्रीय GST (CGST) संकलन 38,100 कोटी रुपये, राज्य GST (SGST) 49,900 कोटी रुपये, एकात्मिक GST (IGST) 95,900 कोटी रुपये असल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून आले. यासह एकूण जीएसटी महसूल 12,300 कोटी रुपये झाला. भारतातील KPMG भागीदार आणि प्रमुख (अप्रत्यक्ष कर) अभिषेक जैन म्हणाले, "गेल्या वर्षीच्या तुलनेत जीएसटी संकलनात सुमारे 10 टक्क्यांची वाढ केवळ आर्थिक स्थिरता दर्शवत नाही तर कंपन्यांनी नियमांनुसार कर भरला असल्याचे देखील दर्शवते. यामुळे आम्ही पुढील तिमाहीत जीएसटी संकलनात आणखी वाढ होण्याची अपेक्षा करु शकतो.
मार्चमध्ये जीएसटी संकलन किती होते?
मार्च महिन्यात निव्वळ जीएसटी संकलन 1.76 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.3 टक्के वाढ दर्शवते. आर्थिक वर्ष 2025 साठी एकूण GST संकलन 22.08 लाख कोटी रुपये होते, जे 9.4 टक्के वाढ दर्शवते. परतावा समायोजनानंतर, आर्थिक वर्ष 2025 साठी निव्वळ GST संकलन 8.6 टक्क्यांनी वाढून 19.56 लाख कोटी रुपये झाले.फेब्रुवारीमध्ये जीएसटी संकलनात 9.1 टक्क्यांनी वाढ झाली, जी देशांतर्गत महसूल स्त्रोतांमध्ये वाढ झाल्यामुळे 183,646 कोटी रुपयांवर पोहोचली. जानेवारीमध्ये जीएसटी संकलन 1.96 लाख कोटी रुपये होते, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 12.3 टक्के वाढ दर्शवते.
म्हत्वाच्या बातम्या:























