Nagpur News : अल्पवयीन मुलीची तस्करी करणाऱ्या महिलेला सात वर्षे कारावास; विशेष सत्र न्यायालयाचा निर्णय
Nagpur News: देहव्यापाराकरिता अल्पवयीन मुलीची तस्करी करणाऱ्या महिलेला दोषी ठरवत सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष सत्र न्यायालयाचे हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय.

Nagpur Crime नागपूर : देहव्यापाराकरिता अल्पवयीन मुलीची तस्करी करणाऱ्या महिलेला दोषी ठरवत कमाल सात वर्षे सश्रम कारावास आणि एकूण पाच हजार 500 रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष सत्र न्यायालयाचे (Special Sessions Court) न्यायाधीश एस. ए. श्रीखंडे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. सीमा प्रेमलाल छाडी ( 40) असे या महिला आरोपीचे नाव असून ती नागपूरातील (Nagpur Crime) गंगा जमुना वस्तीमधील रहिवासी आहे. तर यातील पीडित मुलगी पोलीस (Nagpur Police) तक्रारीच्या वेळी 14 वर्षाची होती. मात्र ज्यावेळी ती अवघ्या चार वर्षांची असताना तीचे अपहरण करण्यात आले होते.
चार वर्षांची असताना अपहरण
प्रकरणातील पीडित मुलगी चार वर्षाची असताना एका अज्ञात आरोपीने खेळणी देण्याचे आमिष दाखवून तिला सोबत नेले होते. त्यानंतर तिला नागपूरसह विविध ठिकाणी ठेवण्यात आले. दरम्यान 9 मे 2022 ला प्रकरणातील दोषी महिला आरोपी नीलम छाडीने पीडित मुलीला जबर मारहाण केली. त्यामुळे मुलीने संधी साधून पळ काढला आणि थेट पोलीस स्टेशन गाठले होते. त्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार लकडगंज पोलिसांना सांगितला होता. यावर पोलिसांनी पीडित मुलीची तक्रार दाखल करून संबंधित संशयित आरोपींविरोधात गुन्हा दखल केला होता. त्यानंतर या प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने संशयित आरोपीविरुद्ध 12 साक्षीदारांचे बयाण तपासून गुन्हे सिद्ध केले आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने अॅड. सोनाली राऊत यांनी कामकाज पाहिले. तर न्यायाधीश एस. ए. श्रीखंडे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय.
मोबाइल मधील चॅटिंग पालकांना दाखविण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार
मोबाइल चॅटिंग पालकांना दाखविण्याची धमकी देत एका 15 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अनिकेत हंसराज खोब्रागडे (21, रा. कामठी) असे या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी त्याची 15 वर्षीय मुलीशी ओळख झाली होती. दरम्यान त्याने मुलीशी जवळीक साधत तिच्याशी चॅटिंग सुरू केले. त्यात काही अश्लील चॅटिंगदेखील होते. ते चॅटिंग तिच्या पालकांना दाखविण्याची धमकी देत अनिकेतने तिच्यावर अत्याचार केला.
हा प्रकार 27 फेब्रुवारी रोजी घडला. त्यानंतर मुलीने धाडस करत या प्रकाराची माहिती पालकांना दिली असता मुलीच्या आईने तत्काळ यशोधरानगर पोलीस स्टेशन गाठून अनिकेत विरोधात तक्रार केली. या तक्रारी वरून पोलिसांनी अनिकेत विरोधात गुन्हा नोंदवत त्यांला अटक केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
