Nagpur Crime News : राज्यात चाललंय तरी काय? मुलींना बघून सार्वजनिक ठिकाणी तरुणाचे अश्लील कृत्य, नागपुरात मानसिक विकृतीचा कळस
Nagpur Crime News : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी महिला आणि मुलींना बसल्याचे बघून अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Nagpur Crime News : राज्यात एकीकडे कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण तापले असताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होतं असल्याचे चित्र आहे. अशातच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी महिला आणि मुलींना बसल्याचे बघून अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूरातील (Nagpur) वॉकिंगट्रॅकवर लागलेल्या कॅमेऱ्यात हा तरुण अश्लीलकृत्य (Crime News) करत फिरत असल्याचे कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे. मात्र शहारातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या नागपूरच्या वर्धा रोडवरील कारागृह परिसरात ही धक्कदायक घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
मुलींना बघून जाणीवपूर्वक अश्लील कृत्य
पुढे आलेल्या माहितीनुसार, रविवारी (9 मार्च) सायंकाळी 9 वाजताच्या सुमारास दोन मैत्रिणी वर्धा रोडवरील कारागृह परिसरात असलेल्या वॉकिंग ट्रॅकवर विरूंगळा म्हणून बसल्या असतांना, आरोपी तरुण तिथे आला आणि त्याने तिथे अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. यावेळी तो मुलींना बघून जाणीवपूर्वक हे कृत्य करत असल्याचे लक्षात आलं. त्यानंतर पिडीत मुलींनी धाडसाने त्याचा व्हिडिओ काढला. त्यानंतर मुलींनी पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. कालांतराने या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता बजाजनगर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव शांतकुमार असून तो नागपुरच्या बड्या हॉटेलमध्ये किचनमध्ये सुपरवायजर म्हणून कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दरम्यान, या प्रकरणी पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ सोशल मीडियावरुन समोर आला आहे. सध्या आरोपी शांत कुमार हा अटकेत असून तो कर्नाटकचा असल्याची माहिती पुढे आली आहे. तो नागपुरातील एका प्रसिद्ध हॅाटेलमध्ये मागील सहा महिन्यांपासून किचन मॅनेजर म्हणून काम करत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून यात गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी सुमोटो आरोपीचा शोध घेतला. आरोपीच्या मोबाईलमध्ये इतर आक्षेपार्ह विडिओ मिळून आले आहते. त्यामुळे तो विकृत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे यापूर्वी ही त्यांने असेच काही कृत्य केले का? याचाही शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

