एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Virar News: गुढीपाडव्याच्या दिवशी विरारमध्ये दुर्दैवी घटना, एसटीपी प्लांट साफ करण्यासाठी उतरलेल्या चार कामगारांचा मृत्यू

Vasai Virar: वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी तात्काळ तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढले. तर अमोल घाटाळ या मजुराचा मृतदेह तीन तासानंतर अग्निशमन कर्मचा-यांनी बाहेर काढला

वसई - विरार :  विरारमध्ये  एका खासगी सांडपाणी प्रकल्पात साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या चार मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ऐन गुढीपाढव्याच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने विरारमध्ये (Virar News) शोककळा पसरली आहे. 

आज मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विरारच्या ग्लोबल सिटी येथे रुस्तमजी शाळेच्या बाजूच्या एसटीपी प्लांटमध्ये खाजगी कंपनीचे तीन मजूर एसटीपी प्लांट चोकअप असल्याने उतरले होते. त्याचवेळी एक मजूर प्लांटमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी दोन मजूर उतरले ते वर न आल्याने एक खाजगी मजूर ही त्यात उतरला आणि दुर्दैवाने यात चारही मजूर गुदमरुन मरण पावले. 

चौथा मृतदेह तीन तासांनी बाहेर 

वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी तात्काळ तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढले. तर अमोल घाटाळ या मजुराचा मृतदेह तीन तासानंतर अग्निशमन कर्मचा-यांनी बाहेर काढला. शुभम पारकर (28), अमोल घाटाळ (27) निखिल घाटाळ (24) आणि सागर तेंडुलकर (29) अशी मृतांची नावे आहेत. ग्लोबल सिटी मधील 124 इमारतीचा हा एसटीपी प्लांट आहे. त्याची साफसफाईची जबाबदारी पॉलिकॉन या कंपनीला दिली होती. आज वसई विरार पालिकेच आयुक्त अनिलकुमार पवार यांनी घटनास्थळी  पाहणी केली. 

सफाई कामगारांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्षच

या अगोदर देखील गुदमरुन मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.  तरीही प्रशासन कामगारांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. कामगारांकडून सफाई काम करुन घेतानाचे  सुरक्षेचे सर्वच नियम धाब्यावर बसवले जात आहेत, असाही आरोप प्रशासनावर होत आहे. यावर न्यायालयानेही अनेकदा सरकारला फटकारले आहे. मात्र, सरकार आणि प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही, असेच दिसत आहे.

 कडक कारवाईची मागणी

सेप्टिक टँक, मॅनहोल यामध्ये जीव धोक्यात घालून कामगारांना काम करावे लागते. यापूर्वीही कामगारांचा सेप्टिक टँक, मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्यामधून महापालिका व इतर खासगी यंत्रणेने यावर कोणतेही ठोस पाऊस उचलले नाही. मुळात  सेप्टिक टँकमध्ये कामगारांना उतरविणे चुकीचे आहे. त्यामुळे या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्याविरोधात  कडक कारवाई करण्यात यावी. त्यामुळे यापुढे अशा दुर्घटना घडणार नाहीत याची दक्षता महापालिकेने घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हे ही वाचा :

Pune Crime News : मित्राच्या मदतीने 18 वर्षीय लेकीनंच आईची हत्या केली; घसरुन पडल्याचा बनाव रचला; पोलीस तपासात मात्र बिंग फुटलं, कारण ठरलं...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM TOP  630 AM 26 November 2024 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सSanjay Bhor on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या पठ्ठ्याने कारण सांगितलंRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्तीRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Embed widget