Pune Crime News : मित्राच्या मदतीने 18 वर्षीय लेकीनंच आईची हत्या केली; घसरुन पडल्याचा बनाव रचला; पोलीस तपासात मात्र बिंग फुटलं, कारण ठरलं...
8 वर्षीय तरुणीने मित्राच्या मदतीने स्वतःच्या आईच्याच डोक्यात हातोड्याचे घाव घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरीत हा संपूर्ण प्रकार घडला.
पुणे : 18 वर्षीय तरुणीने मित्राच्या मदतीने स्वतःच्या आईच्याच डोक्यात (Pune Crime News) हातोड्याचे घाव घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरीत हा संपूर्ण प्रकार घडला. खून केल्यानंतर आई घरातील मोरीत घसरून पडल्याचा बनावही या तरुणी केला होता. मात्र पोलिसांच्या तपासात या तरुणीचं भिंग उघड पडलं. पोलिसांनी याप्रकरणी खुनचा गुन्हा दाखल केला असून या तरुणीच्या मित्राला अटक केली आहे.
मंगल संजय गोखले (वय 45 , राजश्री कॉलनी वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेची मुलगी योशिता संजय गोखले (वय 18) आणि तिचा मित्र यश मिलिंद शितोळे (वय 18, गणेश नगर वडगाव शेरी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. विनोद शाहू गाडे (वय 42 ) यांनी याप्रकरणी तक्रार दिली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आई घरातील मोरीत पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याचा बनाव त्याने रचला होता. मात्र तिच्या नातेवाईकांना याबाबत शंका आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि हा संपूर्ण कट उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता ही मंगल गोखले यांची मुलगी आहे. तिने मित्र यश शितोळे यांच्या मदतीने आईच्या बँक खात्यातून पैसे काढले होते. पैसे काढण्याचे आईला समजले तर ती रागावेल अशी भीती तिला वाटत होती. यातून तिने आईचा खून करण्याचा कट रचला. तिने मित्राला घरी बोलावले. घरातील हातोडा त्याला दिला आणि झोपलेल्या आईच्या डोक्यात हातोड्याची घाव घालून खून करण्यात आला. यश शितोळे डोक्यात हातोडा मारत असताना योशिताने आईचे तोंड स्कार्पने दाबले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.
माया, जिव्हाळा गेला कुठं?
आपल्याच आईच्या डोक्यात हातोडाघालून हत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर अनेक स्तरावरुन संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे नात्यातील ओलावा, माया, जिव्हाळा उरला आहे की नाही, असा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
इतर महत्वाची बातमी-
Prakash Ambedkar : ठाकरे आणि शरद पवारांनी स्वतःमध्ये बदल करावेत, प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र
Jaya Bachchan : अमिताभ आणि मुलांसाठी करिअरचा त्याग केला? जया बच्चन यांनी अखेर मौन सोडले