एक्स्प्लोर

Torres Scam : 13.76 कोटींचं बोगस कर्ज, 75 किलो सोनं,25 किलो चांदी बेकायदेशीरपणे भारतात, टोरेस घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती 

Torres Scam : मुंबई, नवी मुंबईतील जवळपास सव्वा लाख गुंतवणूकदारांची फसवणूक टोरेस घोटाळ्यातून झाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. 

मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई, नवी मुंबईतील नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं. टोरेस ज्वेलरीच्या माध्यमातून महिन्याला जवळपास 44 टक्के परतावा देण्याचं आमिष लोकांना दाखवलं गेलं. यामध्ये जवळपास सव्वा लाख नागरिकांनी गुंतवणूक केल्याची प्राथमिक माहिती आहे. हा घोटाळा जवळपास एक हजार कोटींचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी  फरार असलेल्या तौसिफ रियाजनं एक रिपोर्ट तपास यंत्रणांकडे दिला होता. त्याची प्रत एबीपी माझाच्या हाती लागली आहे. त्यामध्ये सर्वेश सुर्वेच्या पत्राचा देखील उल्लेख आहे. सर्वेश सुर्वे प्लॅटिनम हर्न प्राइवेट लिमिटेडमध्ये संचालक होता. तौसिफ रियाजचा रिपोर्ट आणि सर्वेश सुर्वेच्या पत्रातून काही बाबी समोर आल्या आहेत. त्यानुसार बेकायदेशीरपणे सोनं आणि चांदी भारतात आणली गेली. 13.76 कोटींचं बोगस कर्ज देखील दाखवलं गेलं. याशिवाय पाँझी स्कीमच्या माध्यमातून उच्च परतावा देण्याचं आमिष देखील दाखवलं गेलं. 

सर्वेश सुर्वेनं प्लॅटिनम हर्न प्राइवेट लिमिटेड कंपनीत स्थापनेनंतर संचालक म्हणून काम केलं. तो म्हणाला होता की कंपनी भारतात रिटेल ज्वेलरी बिझनेस व्यवसायात काम करेल, असं त्याला सांगितलं गेलं. विदेशी व्हिसा आणि रोजगार उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्यामुळं कंपनीचा संचालक आणि भागधारक झालो.  

सर्वेश सुर्वे म्हणाला की मुंबईच्या दादर भागात टोरेस ब्रँड नावानं कंपनीनं ज्वेलरी शोरुम लाँच केलं. सुर्वेनं संचालक पदावर असूनही इतर कोणत्याही शोरुमच्या कामात सहभागी नसल्याचं म्हटलं. सुर्वेच्या तक्रारीनुसार कंपनीनं उच्च बोनस, कॅशबॅकसह 200 ते 600 टक्के रिटर्न देण्याचं आश्वासन देत लोकांकडून पैसे स्वीकारण्यास सुरुवात केली. त्या बदल्यात ग्राहकांना दागिण्यांऐवजी कमी गुणवत्ता  असलेल्या मोइसॅनाइटचे दगड दिले गेले. सुर्वेनं हा देखील आरोप केला की कंपनी 13.76 कोटींच्या बोगस लोन व्यवहारात सहभागी होती. बोगस कर्जाची एंट्री कथितपणे लल्लन सिंह नावाच्या व्यक्तीनं केली होती. त्यानं यूएसटीडीच्या माध्यमातून विदेशातून भारतात आलेल्या पैशांचा स्वीकार केला.  

सुर्वेनं पुढं म्हटलं की 27 डिसेंबरला त्याला कंपनीच्या लोअर परेल कार्यालयात बोलावलं गेलं. तिथं काही कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाव टाकला गेला. मात्र, कर्ज करारावर सही करण्यास नकार दिला तेव्हा धमकी दिली गेली अन् मारहाण करण्यात आली. 

कंपनीनं तुर्कीतून 75 किलो सोनं आणि 25 किलो चांदी बेकायदेशीरपणे आणली गेल्याचा दावा करण्यात सुर्वेकरडून करण्यात आला. ते सोनं मुंबईच्या काळंबादेवी परिसरातील एका ज्यूसच्या दुकानावर पोहोचवलं गेलं. याचे पुरावे देखील असून तस्करी झालेल्या सोन्याचे फोटो देखील आहेत, असा दावा सुर्वेनं केला.  

तौसिफ रियाजनं स्वत : जागल्या असल्याचा दावा केला आहे. टोरेस घोटाळा यूक्रेन आणि तुर्कीतील बोगस आर्थिक फसवणूक योजनांसारखा असल्याचं म्हटलं. त्या देशातील B2B ज्वेलरी घोटाळ्यासारखाच टोरेसचा घोटाळा असल्याचं म्हटलंय. 

B2B ज्वेलरी घोटाळा चार पाच वर्षांपूर्वी झाला होता. B2B ज्वेलरी घोटाळा यूक्रेन, रशिया आणि कझाकिस्तानमध्ये 250 दशलक्ष डॉलर्सची फसवणूक झाली होती.त्यावेळी जवळपास 6 लाख गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली होती.

दरम्यान, शिवाजी पार्क पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे. ज्यामध्ये दोन विदेशी नागरिक आहेत. तर, दोन विदेशी नागरिकांचा समावेश आहे.सर्वेश सुर्वेसह तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमारी यांना अटक करण्यात आली आहे. 

इतर बातम्या :

विदेशी आरोपींकडून बनावट ओळखपत्रांचा वापर, नेपाळमार्गे सीमकार्ड मागवली, फरार तौसिफ रियाजकडून धक्कादायक माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lamborghini : मंत्रालयात लेम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
मंत्रालयात लेम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
McDonald in Baramati: रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : दिल्लीत काँग्रेस- आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं; राऊतांचा काँग्रेसला इशाराPune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटकDelhi Anil Desaiदिल्लीत मतांचं विभाजन होणार नाही;आपचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा होताBeed Santosh Deshmukh Family : आज बाबा असते तर.. हत्येला 1 महिना उलटला; लेकीची भावूक प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lamborghini : मंत्रालयात लेम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
मंत्रालयात लेम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
McDonald in Baramati: रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
Delhi Election: उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
Santosh Deshmukh Case : भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...;  धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...; धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
Embed widget