एक्स्प्लोर
नीता अंबानींकडून सुनेला महागडा हिऱ्याचा हार भेट, किंमत तब्बल...
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा भव्यदिव्य लग्नसोहळा 9 मार्च 2019 रोजी पार पडला होता. त्यांच्या लग्नात उद्योग, राजकीय, चित्रपट यासारख्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचं नुकतंच लग्न झालं. आकाशने बालमैत्रीण आणि हिरेव्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहतासोबत 9 मार्च 2019 रोजी लगीनगाठ बांधली. आता हे लग्न आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे नीता अंबानींनी सून श्लोकाला भेट म्हणून दिलेला अतिशय महागडा हिऱ्यांचा हार.
काही दिवसांपूर्वी श्लोकाच्या 'मुंह दिखाई'चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सासू नीता अंबानी यांनी सुनेला भेट म्हणून हिऱ्याचा हार दिला, ज्याची किंमत तब्बल 300 कोटी रुपये असल्याचं कळतं. खरंतर नीता अंबानी आधी श्लोकाला वारशाने मिळालेला सोन्याचा हार देणार होत्या. पण त्यांना सुनेसाठी खास भेट द्यायची होती. अनेक वस्तू पाहिल्यानंतर त्यांनी श्लोकासाठी हिऱ्यांचा हार पसंत केला.
श्लोकाला जो हार मिळाला आहे, त्यात जगभरातील सर्वात महागडे हिरे आहेत. लेबेंन्स ज्वेलर्सने बनवलेल्या या 'L'Incomparable नेकलेसची किंमत 300 कोटी रुपये आहे. सोशल मीडियावर या हाराची तुफान चर्चा होत आहे. नीता अंबानी यांच्याशिवाय श्लोकाची नणंद म्हणजेच इशा अंबानीने भाऊ आणि वहिनीला एक आलिशान बंगला भेट म्हणून दिला.
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा भव्यदिव्य लग्नसोहळा 9 मार्च 2019 रोजी पार पडला होता. त्यांच्या लग्नात उद्योग, राजकीय, चित्रपट यासारख्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शाहरुख खान, रणबीर कपूर, करण जोहर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी ठुमके लगावले. अमिताभ बच्चन, आमिर खान, प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय, सचिन तेंडुलकर, झहीर खान यांनी लग्नाला हजेरी लावली होती.
मुकेश अंबानींचे पुत्र आकाश आणि श्लोका मेहताचा भव्य विवाह, सेलिब्रेटींची हजेरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement