एक्स्प्लोर

Mumbai Crime: मुंबईत चालत्या रिक्षात महिलेचा विनयभंग, जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर उडी मारली; नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: एका 29 वर्षीय महिलेचा चालत्या रिक्षात विनयभंग केल्याची घटना बुधवारी सकाळी बोरिवली परिसरात घडली. घाबरलेल्या महिलेनं मदतीसाठी आरडाओरडा केला, पण तरिदेखील मदत न मिळाल्यामुळे तिनं अचानक रिक्षातून उडी घेतली.

Mumbai Crime News : मुंबई : मुंबईमध्ये (Mumbai News) पुन्हा एकदा महिलांच्या (Womens Safety) सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बोरिवलीत (Borivali) घडलेल्या एका घटनेनं पुन्हा एकदा मुंबईत (Mumbai Crime) महिला खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात निर्माण झाला आहे. शेअर रिक्षात सह प्रवाशाकडून महिलेसोबत गैरवर्तन करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सहप्रवाशाच्या कृत्यामुळे भेदरलेल्या महिलेनं धावत्या रिक्षातून उडी घेतल्याची घटना बोरिवलीत घडली आहे.                               

एका 29 वर्षीय महिलेचा चालत्या रिक्षात विनयभंग केल्याची घटना बुधवारी सकाळी बोरिवली परिसरात घडली. घाबरलेल्या महिलेनं मदतीसाठी आरडाओरडा केला, पण तरिदेखील मदत न मिळाल्यामुळे तिनं अचानक रिक्षातून उडी घेतली. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, सीसीटिव्ही फुटेज तपासून दोन आरोपींना गैरवर्तन आणि विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपींमध्ये प्रवाशासह रिक्षाचालकाचाही समावेश आहे.                          

प्रकरण नेमकं काय?                                                                

बोरिवली पश्चिमेकडील पोईसर येथून रेल्वे स्थानकासाठी शेअर रिक्षा आहेत. बुधवारी सकाळी पिडीत तरुणी रिक्षात बसली. रिक्षामध्ये आधीच एक प्रवासी बसलेला होता. रिक्षा बोरिवली रेल्वे स्थानकाकडे निघाली. रिक्षा सुरू होताच तरुणीशेजारी बसलेल्या व्यक्तीनं तरुणीसोबत सोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तरुणीनं दुर्लक्ष केलं, मात्र त्याचे चाळे थांबत नसल्यानं तिनं रिक्षाचालकाच्या निदर्शनास आणून त्याला रिक्षा थांबविण्यास सांगितलं. रिक्षा चालकानं तरुणीच्या सांगण्याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही. रिक्षा थांबत नसल्याचं पाहून महिलेने आरडाओरडा सुरू केला. तरिही रिक्षा चालक रिक्षा थांबवत नसल्याचं पाहून तरुणीनं थेट धावत्या रिक्षामधून उडी मारली. या घटनेत पिडीत तरुणीही किरकोळ जखमी झाली. 

आवाज ऐकून तेथे उपस्थित असलेल्या एका पोलिसानं तात्काळ ऑटो थांबवून प्रकरणाची चौकशी केली. तसेच, या प्रकरणाची माहिती बोरिवली पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं दोन्ही आरोपींना अटक केली. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur PolicePC : प्रशांत कोरटकरला कशी केली अटक? पोलिसांनी सांगितला A टू Z कहाणीJob Majha : MPSC मार्फत भरती, नोकरीची संधी? अटी काय?Eknath Shinde Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे आमने-सामने, बैठकीत काय घडलं?Indrajeet Sawant : Prashant kortkar ला कायदेशीर शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार : इंद्रजीत सावंत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Embed widget