मुंबईत चार वर्षाच्या चिमुकलीला लिफ्टमध्ये कोंडून मारहाण
मारहाण करुन मन भरलं नाही म्हणून ही क्रूर महिला त्या चिमुकलीच्या अंगवरही बसल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. या मारहाणीमुळे मुलीच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. मात्र अचानक घडलेल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली आहे.

मुंबई : मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर भागात चार वर्षाच्या मुलीला लिफ्टमध्ये कोंडून एका महिलेने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुलीला मारहाण केल्याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे.
बुधवारी दुपारी चार वर्षाची मुलगी संध्याकाळी खेळण्यासाठी इमारतीच्या लिफ्टने खाली जात होती. त्याच इमारतीत राहणारी महिला रिझवाना शेख ही देखील लिफ्टमध्ये होती. लिफ्ट बंद होताच आरोपी महिलेने मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. जवळपास 7-8 मिनिट आरोपी रिझवाना शेख मुलीला मारहाण करत होती.
मारहाण करुन मन भरलं नाही म्हणून ही क्रूर महिला त्या चिमुकलीच्या अंगवरही बसल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. या मारहाणीमुळे मुलीच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. मात्र अचानक घडलेल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी रिझवाना शेख या महिलेला अटक केली आहे. महिलेवर ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला जादूटोणा करत असल्याच आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज