Mumbai Airport Accident: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंगमध्ये हिट अँड रनची धक्कादायक घटना; 5 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Mumbai Airport Accident: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंगमध्ये अपघात झाला.

Mumbai Airport Accident मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Mumbai Airport Accident) हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-2 येथील पार्किंगमध्ये आज (2 फेब्रुवारी) अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पॅसेंजर सोडण्यासाठी आलेल्या मर्सिडिज गाडीवरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात 5 जणं जखमी झाले आहेत.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंगमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये 5 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींमध्ये 2 झेट रिपब्लिक देशाच्या दोघांचा समावेश, तर 3 जणं विमानतळावरील क्रू मेंबर असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींमधील 2 परदेशी नागरिकांवर नानवटी रुग्णालयात, तर विमानतळावरील जखमी क्रू मेंबरवर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
संबधित गाडीही ही नवी मुंबईतील एका हाॅटेलमधून पॅसेंजरला सोडण्यासाठी आली होती. विमानतळ गेट नं 1 येथील स्पिडब्रेकरवर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने ब्रेक एवजी एक्सिलेटर दाबल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याची पोलिसांनी माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी चालकासह गाडी ताब्यात घेतली असून चालकावर सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यासंदर्भात कार्यालयीन निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलंय की, "आज सकाळी CSMIA येथे, T2 च्या डिपार्चर लेनमध्ये चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे पाच जण जखमी झाले. विमानतळावरील वैद्यकीय पथकाने तातडीने प्राथमिक उपचार करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीएसएमआयए प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि ऑपरेशन्स सुरू ठेवण्यासाठी पोलिस आणि इतर टीमसोबत काम करत आहे."
नाशिक- सुरत महामार्गावर सापुताडा घाटात खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात
नाशिक- सुरत महामार्गावर सापुताडा घाटात खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 15 जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. पहाटे साडेपाच वाजता अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. खासगी बस 200 फूट दरीत कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात 7 जण जागीच ठार तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आज पहाटे 5:30 वाजताच्या दरम्यान अपघात झाला.
सापुतारा घाटात खाजगी बसचा अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यु; 15 जण जखमी, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

