एक्स्प्लोर

Morning Headlines 6th September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

IMD Weather Update : उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज

IMD Weather Update : सध्या देशातील बहुतांश राज्यांत पावसाने (Rain) पुन्हा आगमनाला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. हवामान विभागाच्याच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांत पुढील तीन दिवस पाऊस पडणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दक्षिण भारत आणि ईशान्य राज्यांमध्ये 6 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो. IMD च्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश दरम्यान किनारपट्टीपासून दूर आहे. विभागाने सांगितले की, त्याच्या प्रभावामुळे ओडिशात मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.  वाचा सविस्तर 

Rahul Gandhi: राहुल गांधींना लोकसभा सदस्यत्व बहाल करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; याचिका दाखल, पुढील आठवड्यात सुनावणीची शक्यता

Congress MP Rahul Gandhi: सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या शिक्षेला स्थगिती देत राहुल गांधींना दिलासा दिला अन् मानहानीच्या खटल्यात शिक्षा झाल्यामुळे खासदारकी गमावलेल्या राहुल गांधींना पुन्हा त्यांचं लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आलं. पण आता सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींच्या लोकसभा सदस्यत्वाच्या पुनर्स्थापनेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत केरळमधील वायनाड येथील खासदार म्हणून त्यांचं सदस्यत्व बहाल करणारी लोकसभा सचिवालयाची अधिसूचना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर 

नोटांवरही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असंच लिहिलंय, म्हणजे आता तिसरी नोटबंदी? आप खासदाराचं मोदी सरकारवर टीकास्त्र

Sanjay Sing on India Or Bharat Issue: G-20 डिनरच्या (G20 Guest Official Dinner Invitatio) निमंत्रण पत्रिकेवर 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख असल्यानं वादाला तोंड फुटलं आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुनच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्र डागली जात आहेत. अशातच आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार आता तिसरी नोटबंदी करेल, कारण आपल्या चलनी नोटा आहेत त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं लिहिलेलं आहे. त्यामुळे ते नोटांवरुनही इंडिया हटवतील आणि लोकांना पुन्हा नोटा बँकांमध्ये जमा करायला लावतील, असं संजय सिंह म्हणाले आहेत. वाचा सविस्तर 

India: 'इंडिया' नाव बदलून भारत करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च? काय आहे संपूर्ण समीकरण

India: आता देशात भारत आणि इंडिया (India) या वादाला तोंड फुटलं आहे. सध्याच्या सरकारमध्ये ज्या प्रकारे शहरांची नावं बदलली जात आहेत, त्यावरुन सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. आता देशाचं नावही 'इंडिया'वरुन भारत होणार का? याबद्दल चर्चा सुरू आहे. वास्तविक, सध्या दोन्ही नावं अधिकृतपणे वापरली जातात. देशाला इंग्रजीत इंडिया आणि हिंदीत भारत म्हटलं जातं. मात्र आता इंडिया असा उल्लेख न करता भारत असा उल्लेख करण्याचा आणि यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्याचा मोदी सरकारचा मानस असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर 

Chandrayaan 3 Mission: इस्रोची नवी अपडेट! चंद्राच्या पृष्ठभागावरील 3D छायाचित्र केले जारी, सोशल मीडियावर व्हायरल

3D Anaglyph Image Of Chandrayaan 3 :  भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रज्ञान रोव्हरच्या मदतीने एका खास तंत्राद्वारे काढलेलं 3D 'अ‍ॅनाग्लिफ' चित्र प्रसिद्ध केले आहे. इस्रोने मंगळवारी आपल्या ट्विटर हँडलवर चंद्राच्या पृष्ठभागाचे 3D छायाचित्र शेअर केले. प्रज्ञान रोव्हरच्या मदतीने 'अ‍ॅनाग्लिफ' तंत्रज्ञानाचा वापर करून हे चित्र काढण्यात आले आहे. हे छायाचित्र Anaglyph NavCam स्टिरीओ वापरून तयार केले आहे, ज्यामध्ये प्रज्ञान रोव्हरकडून घेण्यात आलेल्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या अशा दोन्ही प्रतिमांचा समावेश आहे. वाचा सविस्तर 

6th September In History : 1965 च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतीय सैन्याची लाहोरपर्यंत धडक; आज इतिहासात...

6th September In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. भारतीय सैन्याने 1965 च्या युद्धात पाकिस्तानचे 'ऑपरेशन जिब्राल्टर' मोडीत काढले. त्यानंतर पाकिस्तानने 'ऑपरेशन ग्रँड स्लॅम'ची सुरूवात केली. त्यालाही भारतीय सैन्याने मोडीत काढले. अखेर भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार धडा शिकवण्याचा निर्धार केला. आजच्या दिवशी भारतीय सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत पाकिस्तानच्या भूभागावर तिरंगा फडकावला. त्याशिवाय, आजचा दिवस चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचा आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार  कमलाबाई रघुनाथ गोखले आणि चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्मदिन आहे. वाचा सविस्तर 

Horoscope Today 6 September 2023 : मेष, सिंह, मीन राशीसह 'या' राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक लाभाची संधी; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 6 September 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीचे लोक बोलण्यातील गोडव्यामुळे समोरच्या व्यक्तीला आकर्षित करू शकतात. तर, वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आज बुधवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget