एक्स्प्लोर

Morning Headlines 5th September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

Opposition Meeting: मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये I.N.D.I.A. आघाडीची पुढची बैठक? संयुक्त रॅलीचीही योजना

मध्य प्रदेश: भाजप (BJP) आणि मोदी सरकारविरोधात विरोधकांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडीची (I.N.D.I.A. Alliance) मूठ बांधली. पाटणा, बंगळुरु, मुंबईनंतर आता विरोधकांच्या इंडिया आघाडीची पुढील बैठक (Opposition Meeting) मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये होण्याची शक्यता आहे. भोपाळमध्ये विरोधकांच्या आघाडीची एकत्रित जनसभा देखील होऊ शकते. पीटीआय वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी सोमवारी (4 सप्टेंबर) ही माहिती दिली. वाचा सविस्तर 

Aditya L1 Mission: आदित्य एल1 बाबत इस्रोने दिलं अपडेट; पूर्ण केली पृथ्वीभोवतची पहिली प्रदक्षिणा, नव्या कक्षेत प्रवेश

श्रीहरिकोटा :  भारताच्या सूर्यायानाने आदित्य एल1 (Aditya L1) ने सूर्य मोहिमेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करुन या यानाने नव्या ऑर्बिटमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच, इस्रोने (ISRO) याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने ट्वीट करत म्हटलं आहे की, आदित्य एल1 या यानाचं दुसरं अर्थ बाऊंड मॅन्यू पूर्ण केलं आहे. याचाच अर्थ या यानाने सूर्याभोवतीची दुसरी प्रदक्षिणा देखील पूर्ण केली आहे. वाचा सविस्तर 

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर काय? झटपट चेक करा

Petrol Diesel Price: देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol and Diesel Price) जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनांचे दर सुधारले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींच्या (Crude Oil) आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर ठरवतात. दिल्लीपासून मुंबईपर्यंत राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींत सुधारणा केली जात होती. वाचा सविस्तर 

Weather Update Today: उत्तर भारतात उष्णतेची लाट, तर काही भागांत पावसाचा अंदाज; 'या' राज्यांमध्ये कसं असेल हवामान? जाणून घ्या

Weather Update Today: सध्या देशातील बहुतांश राज्यांत पावसाने (Rain) उसंत घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकांना दमट उष्णतेचा सामना करावा लागत आहे, तर काही राज्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. IMD च्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत मंगळवारी (5 सप्टेंबर) दिवसा ढगाळ वातावरण असेल आणि रात्री हलका पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील विदर्भात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या पावसानंतर सध्या वातावरण अल्हाददायक आहे. याशिवाय उत्तर भारत, ओदिशा आणि छत्तीसगडमध्ये येत्या 4 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर 

संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडलं जाणार महिला आरक्षण विधेयक? उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले...

Jagdeep Dhankhar On Women Reservation: केंद्र सरकारकडून (Central Government) संसदेचं विशेष अधिवेशन (Special Session of Parliament) बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात मोदी सरकार (Modi Government) काही विशेष विधेयकं मांडणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच महिला आरक्षण विधेयक (Women's Reservation Bill) संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडंलं जाणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आता तो दिवस दूर नाही, जेव्हा देशातील संसद आणि विधानसभेत महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल, असं जगदीप धनखड म्हणाले आहेत. वाचा सविस्तर 

Microsoft : मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! नवख्यांसाठी कॉम्प्युटर टायपिंगचा 'श्रीगणेशा' करणारे अॅप 30 वर्षानंतर बंद होणार

नवी दिल्ली:  अनेकांना पहिल्यांदा कॉम्प्युटरवर टायपिंग शिकवणारे अॅप मायक्रोसॉफ्ट (Microsoft) बंद करणार आहे. जवळपास 30 वर्षानंतर हे अॅप बंद होणार आहे. मायक्रोसॉफ्टने अधिकृतपणे विंडोज ऑपरेटिंग सिस्टमच्या पुढील रिलीझमधून वर्डपॅड काढून टाकणार असल्याचे म्हटले आहे. वर्डपॅड (WordPad) हे एक विनामूल्य बेसिक वर्ड प्रोसेसर असून  जवळजवळ 30 वर्षांपासून विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचा एक भाग आहे. मूळत: 1995 मध्ये विंडोज 95 सोबत वर्डपॅड सादर करण्यात आला होता. तंत्रज्ञान बदलत असताना नव्या अॅप्सच्या गर्दीत वर्डपॅड मागे पडले होते. वाचा सविस्तर

5th September: पॅलिस्टिनी दहशतवाद्यांकडून विमान हायजॅक, भारतीय प्रवाशांची सुटका करताना नीरजा भनोत शहीद, मदर टेरेसा यांचे निधन; आज इतिहासात

5th September In History: भारतात आजचा दिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबर रोजी देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांचा जन्म झाला आणि त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. तामिळनाडू येथे जन्मलेले डॉ. राधाकृष्णन हे भारतीय संस्कृतीचे मार्गदर्शक, प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि महान तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जातात. डॉ.राधाकृष्णन यांना देशाचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न'ही मिळाला आहे. वाचा सविस्तर

Horoscope Today : मेष, मिथुन आणि तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today 5 september 2023 : आज वार मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. मेष मिथुन आणि तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहील. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Police Custody : प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टाचा निकालAsim Sarode On Prashant Koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकरने आलिशान गाड्या कुठून आणल्या याचा शोध घ्यावाABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 25 March 2025 दुपारी 02 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar Hearing Kolhapur : कोर्टात कोरटकरला घाम फुटला; सरकारी वकिलांकडून पोलीस कोठडीची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी, 28 तारखेपर्यंत सरकारी 'पाहुणचार'
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी, 28 तारखेपर्यंत सरकारी 'पाहुणचार'
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
Embed widget