एक्स्प्लोर

Opposition Meeting: मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये I.N.D.I.A. आघाडीची पुढची बैठक? संयुक्त रॅलीचीही योजना

I.N.D.I.A. Alliance Meeting: विरोधकांच्या इंडिया आघाडीची पुढील बैठक मध्य प्रदेशमध्ये होण्याची शक्यता आहे. यासाठी संयुक्त रॅलीचीही योजना आखण्यात आली आहे.

मध्य प्रदेश: भाजप (BJP) आणि मोदी सरकारविरोधात विरोधकांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडीची (I.N.D.I.A. Alliance) मूठ बांधली. पाटणा, बंगळुरु, मुंबईनंतर आता विरोधकांच्या इंडिया आघाडीची पुढील बैठक (Opposition Meeting) मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये होण्याची शक्यता आहे. भोपाळमध्ये विरोधकांच्या आघाडीची एकत्रित जनसभा देखील होऊ शकते. पीटीआय वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी सोमवारी (4 सप्टेंबर) ही माहिती दिली.

भोपाळमध्ये बैठक घेण्यावर एकमत

विरोधी आघाडी इंडियाची (I.N.D.I.A.) नुकतीच मुंबईत बैठक पार पडली. मुबंईत झालेल्या बैठकीत पुढील बैठकीच्या आयोजनावर देखील चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पुढील बैठक भोपाळमध्ये घेण्यावर व्यापक एकमत झालं होतं, परंतु बैठकीची कोणतीही तारीख निश्चित झालेली नाही आणि पुढील बैठकीची रूपरेषाही अद्याप तयार केलेली नाही.

ऑक्टोबरमध्ये I.N.D.I.A. ची चौथी बैठक होण्याची शक्यता

पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधक एकवटले आहेत. NDA विरोधात एकत्रितपणे लढण्यासाठी इंडिया आघाडी योजना आखत आहे. या आघाडीची पुढील बैठक ऑक्टोबरच्या सुरुवातीला होऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं आहे. एनडीएतील नेते देखील त्यांच्या पुढील बैठकीसाठी दिल्लीचा पर्याय म्हणून विचार करत आहेत.

संयुक्त रॅली काढण्याची योजना

एनडीएला घेरण्यासाठी विरोधी पक्षनेते एकजुटीने काम करत आहेत, विरोधकांची ही एकजूट संसदेच्या अधिवेशनातही दिसून आली. I.N.D.I.A. आघाडीने यापूर्वी पाटणा, बंगळुरू आणि मुंबईत तीन बैठका घेतल्या आहेत. या आघाडीची शेवटची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत झाली होती.

मुंबईत झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी शक्य तितकं एकत्र लढण्याचा आणि जागांचा ताळमेळ बसवण्याचा संकल्प केला होता. आता निवडणुका जवळ आल्याने विरोधकांच्या इंडिया आघाडीने एनडीएच्या विरोधात विविध ठिकाणी एकत्रित रॅली काढण्याचा विचार केला आहे. जुलैमध्ये बंगळुरूत झालेल्या दुसऱ्या बैठकीत विरोधकांच्या आघाडीला 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' (I.N.D.I.A.) असं नाव देण्यात आलं होतं.

'इंडिया'ची ताकद वाढली

या इंडिया आघाडीची ताकद आणखी वाढली आहे. यापूर्वी या आघाडीत 26 राजकीय पक्षांचा समावेश होता, आता ती संख्या 28 इतकी झाली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. महाराष्ट्रातील डाव पीडब्लूपी (PWP) आणि आणखी एक प्रादेशिक पक्ष इंडियामध्ये सामील झाला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडलं जाणार महिला आरक्षण विधेयक? उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ambadas Danve on Eknath Shinde : टँकरमध्ये पाणू कुठून टाकणार? अजित पवारासारखं आणणार का?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Embed widget