एक्स्प्लोर

Microsoft : मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! नवख्यांसाठी कॉम्प्युटर टायपिंगचा 'श्रीगणेशा' करणारे अॅप 30 वर्षानंतर बंद होणार

Microsoft WordPad : मायक्रोसॉफ्ट आता वर्डपॅड हे अॅप 30 वर्षानंतर बंद करणार आहेत.

नवी दिल्ली अनेकांना पहिल्यांदा कॉम्प्युटरवर टायपिंग शिकवणारे अॅप मायक्रोसॉफ्ट (Microsoft) बंद करणार आहे. जवळपास 30 वर्षानंतर हे अॅप बंद होणार आहे. मायक्रोसॉफ्टने अधिकृतपणे विंडोज ऑपरेटिंग सिस्टमच्या पुढील रिलीझमधून वर्डपॅड काढून टाकणार असल्याचे म्हटले आहे. वर्डपॅड (WordPad) हे एक विनामूल्य बेसिक वर्ड प्रोसेसर असून  जवळजवळ 30 वर्षांपासून विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचा एक भाग आहे. मूळत: 1995 मध्ये विंडोज 95 सोबत वर्डपॅड सादर करण्यात आला होता. तंत्रज्ञान बदलत असताना नव्या अॅप्सच्या गर्दीत वर्डपॅड मागे पडले होते. 

WordPad अधिकृतपणे काढून टाकल्यानंतर, Microsoft त्याच्या सशुल्क पर्यायी आणि वैशिष्ट्यपूर्ण मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू ठेवणार आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड Office 365 चा एक भाग आहे.

.doc आणि .rtf सारख्या समृद्ध मजकूर दस्तऐवजांसाठी Microsoft Word आणि .txt सारख्या साध्या मजकूर दस्तऐवजांसाठी Windows Notepad चा वापरात असणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.

वर्डपॅडशिवाय यूजर्सना हे पर्याय असतील

आज वर्ड प्रोसेसिंग अॅप्स आणि सेवांची कमतरता नाही. बाजारात अनेक ओपन सोर्स वर्ड प्रोसेसर उपलब्ध आहेत. त्यापैकी काही पूर्णपणे विनामूल्य आहेत. बेसिक टायपिंगसाठी मायक्रोसॉफ्टचे स्वतःचे नोटपॅड अॅप किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड (Microsoft 365) आहे. त्यानंतर Google डॉक्स आहे जे युजर्सना डिव्हाइसवर कोणतेही वेगळे अॅप डाउनलोड न करता कोणतीही Word फाइल ऑनलाइन वापरण्याचा पर्याय देते.

युजर्सवर कसा परिणाम होईल?

वर्डपॅडचा वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर म्हणून वापर करणारे आता फार कमी लोक आहेत. भारतात बेसिक कॉम्प्युटर प्रशिक्षणात वर्डपॅडद्वारे टायपिंगचे धडे दिले जात असे. त्यानंतर कालओघात वर्डपॅड मागे पडले.  वर्डपॅडवर अवलंबून असणारे, त्याचा वापर करणारे युजर्सची संख्या कमी आहे. वर्डपॅड बंद होत असला तरी युजर्सकडे अनेक पर्याय असतील.वर्डपॅड बंद केल्याने फारसा परिणाम होणार नाही. 

मायक्रोसॉफ्ट टीम्स, एक्सेल आणि वर्डमध्ये असणार AI फीचर;

मायक्रोसॉफ्टने (Microsoft)आपल्या यूजर्सना वेगळा अनुभव देण्यासाठी एक मोठा पुढाकार घेतला आहे. कंपनीने घोषणा केली. प्लॅटफॉर्म टीम्स (Teams), एक्सेल (Excel) आणि वर्डला (Word) आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फीचर्ससह जोडणार आहे. Microsoft 365 Copilot नावाने सुरू झालेल्या या सेवेसाठी कंपनीचे नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावे लागतील. बिझनेस टुडेच्या बातमीनुसार, या सेवेसाठी यूजर्सना 30 यूएस डॉलर द्यावे लागतील.

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget