मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख, सरकारची मोठी घोषणा
मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपये रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपये रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे दिली जाणार आहे. एकूण 34 कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाना 10 लाख रूपये देण्याची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ 15 कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रूपये देण्यात आले होते. मागील सरकारचे हे आश्वासन महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल व या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 10 लाख रूपये देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समन्वयकांना दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 कोटी 65लाख रूपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
आजवर शासनाची मदत न मिळालेल्या 19 वारसांना प्रत्येकी 10 लाख तर यापूर्वी पाच लाख रूपये मिळालेल्या 15 वारसांना प्रत्येकी आणखी पाच लाख रूपये या निधीतून दिले जाणार आहे. सरकारची आर्थिक मदत मिळणाऱ्या 34 कुटुंबामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 6, जालना 3, बीड 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. मराठा समाजाच्याा मागणीनुसार हा निधी दिल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला होता. काकासाहेब शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. युवासेना जिल्हाध्यक्ष संतोष माने यांच्या कारवर काकासाहेब शिंदे ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे सहभागी होते. सर्व आंदोलकांनी जलसमाधीसाठी धाव घेतली होती, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र काकासाहेब शिंदे निसटून त्यांनी गोदावरी नदीत उडी मारली.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :
राज्य सरकारमधील ओबीसी मंत्र्यांमुळे मराठा आरक्षणात खोडा, संभाजी ब्रिगेडचा आरोप
Vidarbha state : वेगळ्या विदर्भ राज्याचा विचार? केंद्र सरकारने संसदेला दिली 'ही' माहिती
मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी मारणारा काकासाहेब शिंदे कोण होता?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
