Sanjay Raut : रस्त्यावर गद्दार फिरले नाही पाहिजेत, त्यांचा 'करेक्ट' कार्यक्रम करणार, संजय राऊतांचा इशारा
महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. 56 वर्षे शिवसेना उभी आहे. शिवसेनेचा इतिहास आहे ज्यांनी बाळासाहेबांशी गद्दारी केले त्याचे वाटोळे झाले, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केली आहे.

Sanjay Raut on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात सध्या (Maharashtra Political Crisis) मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी झाली आहे. तर, दुसरीकडे भाजपकडून सत्ता स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. आजच्या सभेनंतर करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आलिबाग येथे झालेल्या सभेत आहे. या सभेत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केला.
गुवाहाटीतील आमदार भाजपचे कैदी
जे आमदार गुवाहटीच्या जेलमध्ये आहेत. ते भाजपचे कैदी आहेत. ब्लू रॅडिसनच्या जेलमध्ये बसले आहे. त्यांना निर्णय घेता येत नाही, श्वास घेता येत नाही. ते भाजपाचे कैदी आहात. बाहेर पडण्याची हिंमत नाही त्याहून महाराष्ट्रात येण्याची देखील हिंमत नाही.
बाळासाहेबांचा विश्वास तोडणार नाही
ईडीची चौकशी टाळण्यासाठी हे नाटक सुरू आहे. मला देखील ईडीची नोटीस आली पण मी माझ्या भूमीकेवर ठाम आहे. मला अटक करा पण मी गुवाहटीच्या जेलमध्ये जाणार नाही. कारवाई झाली तरी मी शिवसेना, भगवा झेंडा सोडणार नाही आणि बाळासाहेबांचा विश्वास तोडणार नाही
बाळासाहेबांशी गद्दारी करणाऱ्यांचे वाटोळे झाले
महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. 56 वर्षे शिवसेना उभी आहे. बाळासाहेबांनी स्थापन केल्यानंतर 260 सेना स्थापन झाल्या पण दोनच सेना टिकल्या आहेत. एक शिवसेना आणि भारतीय सेना. ज्यांनी बाळासाहेबांशी गद्दारी केले त्याचे वाटोळे झाले. आता बैल बदलण्याची वेळ आली आहे.
रस्त्यावर असे गद्दार फिरले नाही पाहिजेत
तुम्ही आनंद दिघ्यांसाठी 50 फटके खाल्ले आता फटके देण्याची वेळ आली. बहुमत आहे मग लपून का बसला आहात. रस्त्यावर असे गद्दार फिरले नाही पाहिजेत. आम्हाला दिघे काय होते हे माहित होते. 22 वर्षात दिघे साहेब आठवले नाहीत.
बंडखोर आमदारांपैकी 22 आमदार दुसऱ्या पक्षाचे
हिंदुत्व आम्हाला शिकवता. अब्दुल सत्तारचे हिंदुत्व कसे धोक्यात आले. एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले 22 आमदार हे दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत. त्यातील काही आमदार राष्ट्रवादीचे आहे. तरी शरद पवारांची तक्रार करत आहे. ज्यांनी घडवले त्यांनाच नावे ठेवता.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदार
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदार आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत. भारतीय जनता पक्षामुळे त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही. ही गोष्ट माहिती असून आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
