Shiv Sena : एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्षप्रमुखपदाकडे वाटचाल सुरु झालीय का?
Shiv Sena : आम्हीच शिवसेना, आम्हीच शिवसैनिक आणि आम्हीच बाळासाहेबांचे वासरदार, असं म्हणत आधी आमदार शिंदेंसोबत गेले. त्यानंतर पदाधिकारी आणि खासदारही शिंदेसोबत गेले.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : शिवसेना आणि शिंदेसेनेचा संघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे. एकिकडे शिंदे गटाकडून आम्हीच शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंबद्दल वाईट बोलणं खपवून घेतलं जाणार नाही असा ठाम इशारा दिला जातो. तर दुसरीकडे शिंदे गटातील नेत्यांकडूनच उद्धव ठाकरेंवर आरोपांच सत्र सुरू झालंय.. ही लढाई आता शिंदे विरुद्ध ठाकरे या दिशेने सुरू झाली आहे. मात्र या आरोपांमधून शिंदे गटाला नेमकं काय साध्य करायचंय? शिवसैनिकांच्या मनात आपुलकी निर्माण करून एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाकडे वाटचाल सुरू आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय.
एकनाथ शिंदेंची पक्षप्रमुखपदाकडे वाटचाल सुरु झालीय का? असा प्रश्न पडतोय. काऱण, आम्हीच शिवसेना, आम्हीच शिवसैनिक आणि आम्हीच बाळासाहेबांचे वासरदार. असं म्हणत आधी आमदार शिंदेंसोबत गेले. नंतर पदाधिकारी गेले. खासदारही शिंदेसोबत गेले. त्यातल्या प्रत्येकानं शिंदेंनाचा आपला नेता मानलंय. मातोश्रीविरोधात बोलणार नाही..पण, एकनाथ शिंदेच आमचे नेते. म्हणत प्रत्येक बंडखोर शक्तिप्रदर्शन करतोय. याच सगळ्या गोष्टींमुळे हा प्रश्न पडतोय. की एकनाथ शिंदे शिवसेनेचे पक्षप्रमुख होणार का? पण, शिवसेनेची घटना काय सांगते.. ठाकरें व्यतिरिक्त कुणी पक्षप्रमुख होवू शकतो का? शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षात एक प्रतिनिधी सभा आहे. त्यात शिवसेना प्रमुख, राष्ट्रीय कार्यकारणी, पक्षनेते आणि उपनेते, राज्य संपर्कप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, राज्यप्रमुख, जिल्हाप्रमुख, आमदार, खासदार आणि मुंबईमध्ये विभाग प्रमुख हे सदस्य आहेत. या सगळ्यांची संख्या 282 होते...हेच सगळे जण मिळून पक्षप्रमुख निवडतात..
शेवटच्या राष्ट्रीय कार्यकारीणीत उद्धव ठाकरेंचीच पक्षप्रमुख म्हणून निवड झालीय. आता जर त्यांना पक्षप्रमुख व्हायचं असेल. तर शिवसेनेच्या घटनेनुसार त्यांना 282 पैकी 188 जणांना पाठिंबा गरजेचा आहे. तसं झालंच, तर उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना पक्ष निसटण्याची भीती आहे. 2018 मध्ये शिवसेनेची कार्यकारिणी पाच वर्षांसाठी निवडली गेली तेव्हा प्रतिनिधी सभेनं नऊ नेत्यांची निवड केली. आणि त्यात राष्ट्रीय कार्यकारणीत सध्या शिंदे गटाचं संख्याबळ कमी आहे. त्यामुळेच की काय, शिंदे गटातील प्रत्येकजण आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत असा दावा करतंय.
सध्या तरी शिवसेनेचं पक्षप्रमुखपद उद्धव ठाकरेंकडे आहे. पण, एकनाथ शिंदेंचा वाढता पाठिंबा. विधानसभेत मिळालेली मान्यता. लोकसभेतही मिळालेली मान्यता. हे सगळं पाहता. पुढच्या काळात पक्षप्रमुखपदावरुनही लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
