Maharashtra Breaking News 29 July 2022 : पालघर - भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
29th July 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आज 29 जुलै. म्हणजेच भारतीय हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना. आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. विविध सण, व्रतवैकल्ये आणि उत्सवाच्या या महिन्यात सगळीकडे आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 29 जुलैचे दिनविशेष.
29 जुलै : श्रावण मासारंभ
भारतीय हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचव्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. शुक्रवार, 29 जुलै 2022 रोजी श्रावण मासारंभ आहे. श्रावणामध्ये दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा, सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे.
29 जुलै : International Tiger Day
जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. 29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. दरवर्षी 29 जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे प्राथमिक लक्ष्य आहे. शिकार आणि बेकायदेशीर व्यापार तसेच अधिवास गमावल्यामुळे वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी कमीत कमी केल्यास जंगलांची बचत होईल ज्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासात बचत होईल. म्हणूनच जागरूकता वाढवून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व्याघ्रदिन साजरा केला जातो.
1987 : भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या केल्या.
1904 : साली भारतातील सर्वोच्च पदक भारतरत्न पुरस्कार विजेता आणि पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय उद्योगपती व वैमानिक,तसचं, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे. आर. डी. टाटा यांचा जन्मदिन.
2002 : साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी सुगम संगीताचे प्रतिक म्हणून आपली ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट गायक-संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे निधन.
महत्वाच्या बातम्या :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई नाका परिसरात दाखल, समर्थक आणि भाजप कडून जोरदार स्वागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई नाका परिसरात दाखल, समर्थक आणि भाजप कडून जोरदार स्वागत
पुरवठा निरिक्षकाला 4 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक
गोंदियात पुरवठा निरीक्षकाला ४ हजाराची लाच घेताना गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली असून यात आरोपी लोकसेवक पंकज शिंदे याचा समावेश आहे . तक्रार दार यांच्या वडिलांच्या नावाने लहिटोला गावात स्वस्त धान्य दुकान असून वडील वयोवृद्ध झल्याने हि दुकान स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी तक्रार दार यांनी गोंदिया अन्न पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक पंकज शिंदे याच्याशी संपर्क साधला असता दुकान नावावर करून घेण्यासानाठी पाच हजार रुपयाची मागणी केली असता तक्रार दार याना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली असून आरोपी लोकसेवक शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयांची मागणी केली असता तळजोळी अंती ४ हजार रुपयांचे देणे ठरले असता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकऱ्यानी सापळा रचत पंकज शिंदे यांना ४ हजार रुपयाची लाच घेताना अटक केली असून ऱ्यांच्या विरुद्ध गोंदिया शहर पोलिश ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्या अन्नवे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
पालघर - भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तीन गंभीर
पालघर मनोर रोडवरील सेंट जॉन कॉलेज जवळ ट्रक बाईक आणि उभ्या असलेल्या कारचा भीषण अपघात,,दोघांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी,,,मृतामध्ये एका चार वर्षीय चिमुकलीचा समावेश,,वडीलासह चिमुकलीचा मृत्यू,,,ट्रक चालकाने बाईकला जोरदार धडक दिल्याने झाला भीषण अपघात,,,पालघर पोलीस घटनास्थळी दाखल,,जखमींना उपचार करिता पालघर ग्रामीण रुग्णालयात हलविले,,ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याची पोलिसांची माहिती.
मंकीपॅाक्सचे राज्यातील सर्व दहा संशयित निगेटिव
मंकीपॅाक्सचे राज्यातील सर्व दहा संशयित निगेटिव आले आहेत. दहा संशयित रुग्णांची सँपल एन आय व्ही. पुणे यांना पाठविण्यात आली आहेत. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत. एन. आय व्ही. पुण्यासह मंकी पॉक्स निदानाची सोय आता राज्यातील आणखी दोन प्रयोगशाळा मध्ये उपलब्ध होणरा आहे. यात मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय मध्यवर्ती प्रयोगशाळा आणि नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा समावेश आहे.
Nagpur Covid Update : जिल्ह्यात 215 नवे कोरोना बाधित, एकाचा मृत्यू
नागपूरः जिल्ह्यात दररोज दोनशेच्यावर रुग्णसंख्या आढळून येण्याची मालिका शुक्रवारीही कायम असून प्राप्त अहवालानुसार 215 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तसेच 217 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यासोबतच एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 76 कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 1586 बाधित गृहविलगीकरणात आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात 1768 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या.