17 March 2022 Breaking News LIVE Updates : सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी तापमान 41 अंशावर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील खारघरच्या डोंगरावर काल रात्री वणवा त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत होते. हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. खारघरच्या डोंगरावर लागलेली आग विझलेली आहे. रात्री 3 च्या दरम्यान आग नियंत्रणात आली होती. खारघर अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या आग नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत होत्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आलं. या आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.
खारघरच्या डोंगराला लागूनच अनेक रहिवाशी इमारती असून डोंगराच्या काही भागात अदिवासी पाडे आहेत. दरम्यान, काल अशाचप्रकारे माथेरानच्या डोंगरावर वणवा पेटला होता. आणि आज खारघरचा डोंगर वणव्याचा वेढा पडलाय. त्यामुळं ही आग लागली की लावण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे.
नवी मुंबईतील खारघरच्या डोंगरावर वणवा पेटला होता. सुका कचरा आणि गवतामुळं ही आग पसरत गेली. मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत होते. हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. डोंगराला लागूनच अनेक रहिवासी इमारती असून डोंगराच्या काही भागात अदिवासी पाडे देखील आहेत.
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी निलंबित करण्यात आलेले तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून रद्द करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांना पुणे जिल्ह्यातील शिरुर इथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश देखील जारी करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर 2021 रोजी आग लागून 14 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावेळी या विभागात कोरोनाचे 17 रुग्ण उपचार घेत होते. हे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 9 नोव्हेंबर 2021 रोजी या अग्निकांड प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना निलंबित करण्यात आलं होतं. अग्निकांड प्रकरणी ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.
साईबाबांची गुरूवारची पालखी तसेच रंगपंचमीला निघणारी साईंच्या रथाची मिरवणूक स्थगित
साईबाबांची गुरूवारची पालखी तसेच रंगपंचमीला निघणारी साईंच्या रथाची मिरवणूक स्थगित, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने १७ मार्च ते २२ मार्च पर्यंत निर्बंध...
मुंबई राष्ट्रवादी अध्यक्षपदाची जबाबदारी दोन नेत्यांकडे
मुंबई राष्ट्रवादी अध्यक्षपदाची जबाबदारी राखी जाधव आणि नरेंद्र राणे यांच्यावर सोपण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर हा पदभार राष्ट्रवादीने या दोन नेत्यांकडे सोपवला आहे.
महाभ्रष्ट आघाडी सरकारची होळी; भाजपाचे उस्मानाबादेत अनोखे आंदोलन
Solapur Temperature : सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी तापमान 41 अंशावर
Solapur Temperature : सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी तापमान 41 अंशावर गेले आहे. आज सोलापुरात उच्चतम 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काल देखील पारा 41 अंशावर होता. केवळ एका आठवड्यात पारा 28 अंशावरून 41 अंशावर पोहोचला आहे,
IPL : आयपीएल बस तोडफोड प्रकरण; मनसेच्या पाच जणांना जामीन मंजूर
मनसेच्या कार्यकर्त्यांनी आयपीएल बस फोडल्याची घटना बुधवारी घडली होती. त्या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. आता या पाच जणांना जामीन मंजूर झाला आहे.