एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Breaking News 15 August 2022 : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 15 August 2022 : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Background

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत... 

देशात अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा, पंतप्रधानांचे देशवासियांना संबोधन
आज देश आपला अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. त्यानिमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग नवव्यांदा देशाला संबोधन करणार आहेत. 

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध कार्यक्रमांची घोषणा करण्याची शक्यता आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची घोषणा केली असून देशवासियांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच स्वदेशी तोफेच्या सहाय्याने 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी 7.18 मिनीटांनी आगमन होणार आहे. त्या आधी ते राजघाटवर जाऊन त्या ठिकाणी महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लष्कराच्या तीनही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. 

सकाळी 7.30 वाजता लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजवंदन होणार असून त्यानंतर ते देशवासियांना संबोधन करणार आहेत. 

मुख्यमंत्री वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजावंदन करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहतील. त्यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी सकाळी 8.15 वाजता ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे.  त्यानंतर ते  9.15 वाजता मंत्रालयात ध्वजरोहणासाठी उपस्थित राहतील. 

स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभर उत्साह
देशात आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने देशभर उत्साह आहे. राज्यातील त्या-त्या राजधानीच्या ठिकाणी संबंधित मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडणार आहे. तर देशाच्या विविध ठिकाणी आज विद्यार्थी आणि तरुणांकडून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. 

विनायक मेटे यांच्यावर आज अंत्यसंस्कार
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये काल रात्री आणण्यात आलं आहे. त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. अंत्यदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात येणार आहे. तिथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून अंत्यसंस्कारासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे.

दरम्यान, विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 1 वाजता विमानाने औरंगाबादमध्ये येतील. त्यानंतर कडे रवाना होतील. 3.40 वाजता ते विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील. 

22:49 PM (IST)  •  15 Aug 2022

मुलुंडमध्ये स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

मुलुंडच्या नानेपाडा विभागात असलेल्या मोती छाया या दुमजली इमारतीत स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीत दुसऱ्या मजल्यावर  देविशंकर शुक्ला आणि त्यांची पत्नी अरखीबेन शुक्ला रहात होते. सुमारे आठ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घराखालील रूम चे स्लॅब खाली कोसळले. त्यात दोघेही स्लॅबसोबत खाली कोसळून गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

18:26 PM (IST)  •  15 Aug 2022

जायकवाडी धरणातून 28 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग

जायकवाडी पाणीसाठा 

1. पाणीपातळी - 463.632 मी.
2. पाणी पातळी - 1521.10 फूट
3. जीवंत साठा= 2063.465 दलघमी.
(प्रकाल्पीय साठा - 2170.935 दलघमी)
4. एकूण पाणी साठा - 2801.571 दलघमी
(प्रकाल्पीय साठा -2909.041 दलघमी)
5.  टक्केवारी= 95.05%

विसर्ग

1. नदीपात्रात सांडव्या द्वारे -  28296 क्यूसेक्स
2. जलविद्युत केंद्रातून - निरांक
3. उजवा कालवा - 600 क्यूसेक्स
4. सर्व एकूण विसर्ग - 28896 क्यूसेक्स 

06:24 AM (IST)  •  15 Aug 2022

Vinayak Mete : विनायक मेटे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

Vinayak Mete : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये काल रात्री आणण्यात आलं आहे. त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. अंत्यदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात येणार आहे. तिथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून अंत्यसंस्कारासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे.

दरम्यान, विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 1 वाजता विमानाने औरंगाबादमध्ये येतील. त्यानंतर कडे रवाना होतील. 3.40 वाजता ते विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील. 

06:22 AM (IST)  •  15 Aug 2022

Independence Day : स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभर उत्साह

Independence Day : देशात आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने देशभर उत्साह आहे. राज्यातील त्या-त्या राजधानीच्या ठिकाणी संबंधित मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडणार आहे. तर देशाच्या विविध ठिकाणी आज विद्यार्थी आणि तरुणांकडून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. 

06:22 AM (IST)  •  15 Aug 2022

Independence Day 2022 : मुख्यमंत्री वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन करणार

Independence Day 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहतील. त्यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी सकाळी 8.15 वाजता ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे.  त्यानंतर ते  9.15 वाजता मंत्रालयात ध्वजरोहणासाठी उपस्थित राहतील. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP MajhaZero Hour Shital Mhatre | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कोणाची इच्छा? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget