एक्स्प्लोर

Important Days in February 2022 : फेब्रुवारी महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

Important Days in February 2022 : 2022 हे नवीन वर्ष सुरु झालं आहे. नवीन वर्षाचा पहिला महिना संपून काहीच दिवसात फेब्रुवारी महिना उजाडणार आहे. या निमित्ताने जाणून घ्या फेब्रुवारी महिना दिनविशेष.

February calander update : अवघ्या दोन दिवसांवर फेब्रुवारी महिना येऊन ठेपला आहे. अशातच, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की फेब्रुवारी महिन्यात कोणकोणते सण आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचे दिवस साजरे केले जातात. तसेच प्रत्येक दिनाचं वेगळं महत्व नेमकं काय आहे. चला जाणून घेऊयात. 

1 February – Indian Coast Guard Day
इंडियन कोस्ट गार्ड (ICG) ही भारताची सागरी कायद्याची अंमलबजावणी आणि शोध आणि बचाव एजन्सी आहे. 1978 साली, 18 ऑगस्ट रोजी तटरक्षक कायदा, 1978 द्वारे भारतीय तटरक्षक दलाची अधिकृत स्थापना करण्यात आली. परंतु 1 वर्षाच्या आधी 1977 मध्ये, 1 फेब्रुवारीला आणीबाणीमुळे, तस्करी रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार, दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशात भारतीय तटरक्षक दिन साजरा केला जातो. 

2 February - माघ महिना सुरुवात
हिंदू पंचांगानुसार अमावस्या तिथीनंतर नवीन महिना सुरू होतो. अशा प्रकारे पौष महिन्याच्या अमावास्येनंतर 1 फेब्रुवारी पासून माघ महिना सुरू होईल. तर त्याचवेळी नवीन माघ महिना सुरू झाल्यावर प्रमुख उपवास सण साजरे केले जातात. 2 फेब्रुवारीला माघ अमावस्या आहे. 2 फेब्रुवारीपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात होत आहे.


Important Days in February 2022 : फेब्रुवारी महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

4 February - World Cancer Day
भारतात दरवर्षी हजारो लोकांचा कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने मृत्यू होतो. 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कॅन्सर दिवस साजरा करण्यात येतो. कॅन्सरसारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजाराबाबत जागरूकता पसरविण्यासाठी अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतं.

4 February - गणेश जयंती (माघी गणेश जयंती)
गणेशभक्तांसाठी महत्त्वाच्या असणार्‍या सणांपैकी एक म्हणजे माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti). गणेश जयंती हा दिवस म्हणजे गणरायाचा जन्मदिन. त्यामुळे काही गणेशभक्त भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे गणेश जयंतीला देखील घरोघरी दीड दिवसांच्या गणेशमूर्तीची स्थापना करतात. या निमित्ताने गोडाधोडाचं जेवण बनवून गणेश जयंती साजरी करतात. 


Important Days in February 2022 : फेब्रुवारी महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

5 February to 13 February- Kala Ghoda Festival
देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टीवल म्हणून या फेस्टीवलची ओळख आहे. दरवर्षी मुंबईत या फेस्टीवलचं आयोजन केलं जातं. या फेस्टीवलचं यंदाचं हे तेविसावं वर्ष आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हा फेस्टीवल आयोजित करण्यात येतो. या फेस्टीवलचं वैशिष्ट्य म्हणजे 40 पेक्षा जास्त कलाप्रकार या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे कलाप्रेमींसाठी ही एक पर्वणीच आहे.

5 February - वसंत पंचमी
वसंत पंचमीचा सण 5 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. वसंत म्हणजे सौंदर्य, शब्दांचे सौंदर्य, वाणीचे सौंदर्य, निसर्गाचे सौंदर्य, प्रवृत्तीचे सौंदर्य. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी देवी सरस्वतीचा प्रकट दिन साजरा केला जातो. शास्त्रानुसार या दिवशी देवी सरस्वतीचे दर्शन झाले होते.

7 February - रथसप्तमी 
हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते. या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतो.. लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य देतो.

8 February - Safer Internet Day (second day of the second week of February)
सर्वप्रथम 2004 साली युरोपमध्ये 'सेफर इंटरनेट डे' ( Safer Internet Day) साजरा करण्यात आला. ऑनलाइन फ्रॉडच्या वाढत्या घटनांच्या या काळात आपण आपले इंटरनेट अधिक सुरक्षित आणि अधिक जबाबदार पद्धतीने कसं वापरायचं याची माहिती असणं आवश्यक आहे. हा दिवस जगभर 'सेफर इंटरनेट डे' म्हणजे सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून साजरा केला जातो. ऑनलाइन फ्रॉडच्या वाढत्या घटनांच्या या काळात आपण आपले इंटरनेट अधिक सुरक्षित आणि अधिक जबाबदार पद्धतीने कसं वापरायचं याची माहिती असणं आवश्यक आहे. यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 

10 February - National De-Worming Day
भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय जंतनाशक दिन हा भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा देशातील प्रत्येक बालक जंतमुक्त करण्यासाठीचा एक उपक्रम आहे. अल्प कालावधीत मोठ्या संख्येने मुलांपर्यंत पोहोचणारा हा सर्वात मोठा सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम आहे. 


Important Days in February 2022 : फेब्रुवारी महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

12 फेब्रुवारी - माघी एकादशी

या दिनाला हिंदू धर्मात फार महत्वाचे स्थान आहे. या दिवशी पंढरपुरात विठुरायची महापूजा केली जाते. विठुरायाचे मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात येते. आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्र महिन्यात माघी एकादशी साजरी केली जाते. पंढरपुरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. परंतु, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून एकही वारी झाली नाही. 

12 February – Darwin Day
डार्विन आणि उत्क्रांतिवाद हे जणू एक समीकरणच मानले जाते. उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे बदल होय. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते. चार्लस डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात. चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे एक ब्रिटिश पदार्थशास्त्रज्ञ आणि भूवैज्ञानिक होते. विज्ञानाच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांनी मानवाच्या उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांना साध्या सरळ प्रयोगांच्या माध्यमाने जगापुढे आणले. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 साली इंग्लंड येथील शोर्पशायर शहरातील श्रेब्स्बुरी या गावी झाला. 


Important Days in February 2022 : फेब्रुवारी महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

12 February - Abraham Lincoln's Birthday
12 फेब्रुवारी इ.स.1809 हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 'अब्राहम लिंकन डे' किंवा 'लिंकन डे' म्हणूनही ओळखला जातो. अब्राहम लिंकन हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होय. ते अमेरिकेतील खूपच लोकप्रिय आणि यशस्वी राष्ट्राध्यक्ष होते.


Important Days in February 2022 : फेब्रुवारी महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

13 February - जागतिक रेडिओ दिन (World Radio Day)
आजच्या प्रमाणे इंटरनेटचा विकास न झालेल्या काळात रेडिओ हेच एक मनोरंजन आणि शिक्षणाचं माध्यम होतं. 13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले. त्यामुळे 13 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक रेडिओ दिन' म्हणून साजरा केला जातो. ‘ऑल इंडिया रेडिओ’ला ‘आकाशवाणी’ हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. भारतात रेडिओची सुरुवात 1923 साली रेडिओ क्लब इथे झाली.1936 साली त्याला ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे नाव मिळाले. 

13 February – Sarojini Naidu Birth Anniversary 
भारतीय महान क्रांतिकारक सरोजिनी नायडूंचा जन्म 13 फेब्रुवारी 1979 ला एका बंगाली कुटुंबात झाला. सरोजिनी नायडू यांचे माहेरचे आडनाव नायडू होते तर सासरचे आडनाव चट्टोपाध्याय असे होते. सरोजिनी नायडू एक उत्तम राजकारणी आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या या शिवाय त्या एक फेमिनिस्ट, कवयित्री, आणि आपल्या काळातील एक महान वक्त्या देखील होत्या. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींबरोबर लढलेल्या सरोजिनी नायडू यांना 'भारताची कोकिळा' असेही म्हटले जात होते. 

14 February - Valentines Day
तरूणाईत प्रचंड लोकप्रिय असणारा दिवस म्हणजे व्हेलेंटाईन डे. 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून भारतभर प्रसिद्ध आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्याचा हा दिवस आहे. साधारणपणे 1700 वर्षापूर्वी, तिसऱ्या शतकात रोममध्ये व्हॅलेंटाईन नावाचा एक सेन्ट अर्थात संत होऊन गेला. त्यावेळी रोममध्ये क्लॉडियस दुसरा या राजाचे राज्य होतं. या राजाला जग जिंकण्याची मनिषा होती. त्यामुळेच या दिनाला विशेष महत्व आहे. साधारणपणे 7 ते 14 फेब्रुवारी असा एक आठवडा व्हेलेंटाईन विक (Valentines week) साजरा करण्याची प्रथा आहे. 

16 February - संत रविदास जयंती
संत रविदास यांचा जन्म सन 1398 मध्ये काशी येथे झाला. चर्मकार समाजाच्या रविदासांचा वडिलोपार्जित धंदाही चामड्यापासून पादत्राणे व अन्य वस्तू बनविणे हा होता. परंतु, रविदास लहानपणापासून ईश्वरभक्तीकडेही वळले होते. वाईट कर्म त्यागून परमेश्वर भक्तीकडे जा तोच खरा मार्ग आहे, असे त्यांचे म्हणणे होते.

18 February to 27 February - ताज महोत्सव
शाहजहानने 1628-1658 काळापासून पाचवे मुघल सम्राट म्हणून राज्य केले आणि त्याची आवडती पत्नी मुमताज महलच्या मृत्यूनंतर तिची आठवण म्हणून ताजमहाल बांधले. मुघल काळाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, ताज महलसमोर फेब्रुवारीमध्ये 'ताज महोत्सव' नावाचा 10 दिवसांचा वार्षिक कार्यक्रम साजरा केला जातो. आग्रा पर्यटन विभागामार्फत या उत्सवाचे आयोजन केले जाते.1992 मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाची भव्यता अनेक दशकांमध्ये अनेक पटींनी वाढली आहे. जगभरातील हजारो लोक आणि प्रवाशांना आकर्षित करणारा हा कार्यक्रम देशाच्या विविध भागांतील कला, संस्कृती आणि खाद्यपदार्थाने परिपूर्ण असा उत्सव आहे. 


Important Days in February 2022 : फेब्रुवारी महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

19 February - छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार)

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एका उत्सवाप्रमाणे आहे. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. समाजाच्या सर्व स्तरांतून शिवजयंती साजरी होताना प्रत्येक जण आपापल्या परीने शिवरायांना मानवंदना देत असतो. या दिवशी काहीजण त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात तर काहीजण सार्वजनिक मिरवणूक काढतात. शिवाजी महाराज हे एक थोर महापुरुष होते. त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व, स्वराज्य स्थापना तसेच राज्य कारभार असे सर्व बोध समाज मनाला होण्यासाठी शिवजयंती प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर समाजातील सर्व स्तरांतील लोकांकडून साजरी केली जाते. 

20 February - Arunachal Pradesh Foundation Day

अरुणाचल प्रदेश हे 20 फेब्रुवारी 1987 रोजी भारताचे 24 वे राज्य बनले. 1962 पूर्वी अरुणाचल हे नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सी (NEFA) म्हणून ओळखले जात होते. 1972 मध्ये ते केंद्रशासित प्रदेश बनले आणि त्याला अरुणाचल प्रदेश असे नाव मिळाले. आणि 20 फेब्रुवारी 1987 रोजी त्याचे नाव भारतीय संविधानात 24 वे राज्य म्हणून नोंदवले गेले.

20 February - World Day of Social Justice
दरवर्षी 20 फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिवस असतो. सामाजिक न्यायाबद्दल जनजागृती करणं, हा या दिवसामागजचा मुख्य हेतू. थेट मानवतेशी संबंध असणाऱ्या या दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्रांकडूनच करण्यात आली. विविध स्तरांवर होणारा भेदभाव दूर लोटत एकतेच्या मार्गावर सर्वांनाच एकवटणं हा हासुद्धा त्यामागचा आणखी एक हेतू.

20 February - संकष्ट चतुर्थी
संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटाचा पराभव करणारी चतुर्थी. संकष्ट हा संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे, ज्याचा अर्थ 'कठीण प्रसंगातून सुटका' असा होतो. संकष्टी चतुर्थी हा हिंदू धर्माचा प्रसिद्ध सण आहे. हिंदू मान्यतेनुसार कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. इतर सर्व देवतांमध्ये गणेशाची पूजा प्रथम मानली जाते.

21 February - International Mother Language Day
आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुभाषावादाला प्रोत्साहन देण्यासाठी, भाषिक आणि सांस्कृतीक विविधतेला चालना देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस युनेस्कोच्या वतीनं (UNESCO) 1999 साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला. त्याला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने 2002 साली मान्यता दिली.

23 February - संत गाडगेबाबा जयंती
गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावतीतील शेंडगाव येथे झाला. ते महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती.

24 February -  जागतिक मुद्रण दिन (Printers’ Day)
प्रत्येक वर्षी 24 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक मुद्रण दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. मुद्रणकलेचा जनक योहानेस गुटेनबर्ग यांचा जन्मदिन 'जागतिक मुद्रण दिन' म्हणून साजरा केला जातो. मुद्रण कलेच्या शोधामुळेच आज आपण वैचारिकदृष्ट्या समृद्ध आहोत. आज आपण सोशल मीडिया क्षेत्रात केलेली प्रगतीही मुद्रण कलेचा उत्तम नमुना आहे.

25 February - रामदास नवमी
रामदास स्वामी यांचा जन्म 1608 ला महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जांब या गावात रामनवमी च्या दिवशी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. संत रामदासांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी होते. ब्राह्मण समाजाचे असल्याने त्यांचा अत्याधिक वेळ परमेश्वराच्या भक्तीत जात असे. नारायण यांना आपल्या वडिलांकडून धार्मिक शिक्षण प्राप्त झाले. रामदास स्वामी यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. “दासबोध” "मनाचे श्लोक" हे त्यांचे पवित्र ग्रंथ आहेत. 


Important Days in February 2022 : फेब्रुवारी महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

26 February - स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी
विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला. ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक होते. त्यांना पन्नास वर्षाची काळे पाण्याची शिक्षा झाली होती आणि अशी शिक्षा झालेले हे एकमेव स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी होते."ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला" या सुप्रसिद्ध गाण्यातून त्यांनी मातृभूमीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

27 February - मराठी राजभाषा दिन (Marathi languague Day) -
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण 'मराठी राजभाषा दिवस' म्हणून साजरा करतो. हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जाणारा दिन आहे. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा आहे. कुसुमाग्रजांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुण्यात झाला. कुसुमाग्रज हे मराठी लेखक होते. 1987 मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

28 February – राष्ट्रीय विज्ञान दिन (National Science Day)  

28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Embed widget