एक्स्प्लोर

Amit Shah in Maharashtra : लोकसभेच्या तोंडावर पीएम मोदी-अमित शाहांचे महाराष्ट्रात दौऱ्यावर दौरे सुरुच; आता अमित शाहांचा विदर्भ दौरा ठरला

पश्चिम विदर्भामध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये अमित शाह कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी अमित शाह यांचा संवाद साधणार आहेत.

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रामधील (Maharashtra) दौरे अचानक वाढले आहे. या नव्या वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी दोन वेळा महाराष्ट्र दौरा केल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा सुद्धा विदर्भामध्ये दौरा निश्चित करण्यात आला आहे. अमित शाह 15 फेब्रुवारी रोजी अकोला दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा असेल. 

पश्चिम विदर्भामध्ये अमित शाह कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम विदर्भामध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये अमित शाह कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी अमित शाह यांचा संवाद साधणार आहेत. हा दौरा निश्चित होत असतानाच 19 फेब्रुवारी रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांच्याकडून कोस्टल रोडचे लोकार्पण करण्यात येणार आहेत. 

पीएम मोदी दोन महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर येणार

तत्पूर्वी, त्यांनी अटल सागरी सेतूचे उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्र दौरा केला होता. राम मंदिर सोहळ्यापूर्वी त्यांनी नाशिकला काळाराम मंदिरामध्ये भेट दिली होती. हा सर्व घटनाक्रम पाहता भाजपकडून आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे आयोजित केले जाच आहेत. राज्यामध्ये महायुती सरकार असलं, तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पूरक वातावरण नसल्याने भाजपच्या नेतृत्वाकडून अमित शाह आणि मोदींचा दौऱ्यांवर दौरे आयोजित केले जात आहेत का? अशीही चर्चा आहे. 

Mood of The Nation Survey मध्ये महायुतीला फटका बसण्याचा अंदाज

दुसरीकडे, इंडिया टुडे मूड ऑफ द नेशनच्या (Mood of The Nation Survey on Maharashtra) फेब्रुवारी 2024 मधील सर्वेमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना 22 जागा मिळण्याचा अंदाज इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशनमध्ये वर्तवण्यात आला आहे.  2019 मध्ये एनडीएला मिळालेल्या जागांपेक्षा तब्बल 19 जागांचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका जानेवारीमध्ये झाल्यास महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 26 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेल्या गटांचे स्वागत केलं असलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर भाजपला काही फायदा झालेला दिसून येत नाही, असेही सर्व्हेतून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : विराटच्या दमदार शतकाचं पाकिस्तानात जोरदार सेलिब्रेशन, किंग कोहलीच्या चाहत्यांचा व्हिडीओ समोर
विराट कोहलीच्या पाकिस्तानमधील चाहत्यांकडून  जल्लोष, शतक पूर्ण होताच जोरदार सेलिब्रेश, पाहा व्हिडीओ
Raj Thackeray & Uddhav Thackery: सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंची भेट, गप्पा सुरु असताना रश्मी वहिनींना हसू आवरेना
लग्नमंडपात उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या गप्पा, रश्मी वहिनींना हसू आवरेना
Virat Kohli and Anushka Sharma : '..लव्ह यू ', विराटचं शतक होताचं अनुष्काच्या स्टोरीने लक्ष वेधलं
'..लव्ह यू ', विराटचं शतक होताचं अनुष्काच्या स्टोरीने लक्ष वेधलं
Beed : वाल्मिक कराडचा निकटवर्तीय बालाजी तांदळे रडारवर, त्याच्याच कारमधून आरोपींचा शोध घेणारे बीड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
वाल्मिक कराडचा निकटवर्तीय बालाजी तांदळे रडारवर, त्याच्याच कारमधून आरोपींचा शोध घेणारे बीड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 AM : 24 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Manikrao Kokate : पत्राची प्रतीक्षा, कोकाटेंना होणार शिक्षा? आमदारकी जाणार?ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 23 February 2025Special Report Anjali Damania On Beed Police : बीड पोलीस, आरोपीच्या पिंजऱ्यात; दमानियांच्या रडारवर बालाजी तांदळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : विराटच्या दमदार शतकाचं पाकिस्तानात जोरदार सेलिब्रेशन, किंग कोहलीच्या चाहत्यांचा व्हिडीओ समोर
विराट कोहलीच्या पाकिस्तानमधील चाहत्यांकडून  जल्लोष, शतक पूर्ण होताच जोरदार सेलिब्रेश, पाहा व्हिडीओ
Raj Thackeray & Uddhav Thackery: सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंची भेट, गप्पा सुरु असताना रश्मी वहिनींना हसू आवरेना
लग्नमंडपात उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या गप्पा, रश्मी वहिनींना हसू आवरेना
Virat Kohli and Anushka Sharma : '..लव्ह यू ', विराटचं शतक होताचं अनुष्काच्या स्टोरीने लक्ष वेधलं
'..लव्ह यू ', विराटचं शतक होताचं अनुष्काच्या स्टोरीने लक्ष वेधलं
Beed : वाल्मिक कराडचा निकटवर्तीय बालाजी तांदळे रडारवर, त्याच्याच कारमधून आरोपींचा शोध घेणारे बीड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
वाल्मिक कराडचा निकटवर्तीय बालाजी तांदळे रडारवर, त्याच्याच कारमधून आरोपींचा शोध घेणारे बीड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
India vs Pakistan : 151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती
घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
Embed widget