ओबीसी आरक्षणाशिवाय 18 महापालिकांच्या निवडणुका होणार?; राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू
OBC Reservation : विधानसभेने ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणूक पुढे ढकलण्याचा ठराव केला होत. तर, दुसरीकडे निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

Local Body Election OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळ अधिवेशनात विधानसभेने ओबीसी आरक्षणाचा निकाल येईपर्यंत निवडणूक पुढे ढकलण्याचा ठराव केला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने आता नाशिक, सोलापूर, अकोला, अमरावतीसह 18 महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ७ जानेवारीपर्यंत सर्वच महापालिकांना सुधारित आराखड्यानुसार आरक्षण निश्चितीसाठी सर्वसाधारण प्रवर्ग , अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकसंख्या तसेच अन्य सांख्यिकी माहिती पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर साधारण पुढील दोन ते चार दिवसांत प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
जानेवारीअखेर प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर १ फेब्रुवारीला महापालिका निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात महापालिका निवडणूक प्रचाराचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाचे आदेशात काय म्हटले?
अनुसूचित जाती-जमाती लोकसंख्या तसेच अन्य सांख्यिकी माहितीसह संपूर्ण प्रस्ताव तयार करून ६ जानेवारी रोजी निवडणूक आयुक्तांना सादर करावा असे आदेश निवडणूक आयोगाच्या परिपत्रकात देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इतर मागास प्रवर्गाबाबत त्रिस्तरीय चाचणी करून प्रमाण निश्चित करता नाही, तोपर्यंत या इतर मागास प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण गटातील असतील असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते.
या महापालिकांबाबत निर्णय नाही
राज्य निवडणूक आयोगाने मुंबई आणि औरंगाबाद महापालिकांना आदेशातून वगळण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिकेची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली आहे. परंतु महापालिकेच्या वॉर्डरचनेला कोर्टात आव्हान देण्यात आले होते. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
