ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 डिसेंबर 2024 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 डिसेंबर 2024 | शनिवार
*1*. मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच नागपूरमध्ये होणार , भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याचे संकेत https://tinyurl.com/mpdmrcp2 महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी मंजुरीसाठी दिल्लीला, मान्यता मिळाल्यानंतर रात्रीपर्यंत संभाव्य मंत्र्यांना फोन जाण्याची शक्यता https://tinyurl.com/yc8k5kpc
*2*. पंकजा मुंडे, नितेश राणे, माधुरी मिसाळ, आशिष शेलार आणि गोपीचंद पडळकर, भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर https://tinyurl.com/yppvwcm7 शिवसेनेच्या यादीत अनपेक्षित बदल पाहायला मिळण्याची शक्यता, अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना नारळ दिला जाण्याची चिन्हं https://tinyurl.com/d8kvtfyx
*3*. दादर स्टेशनच्या हनुमान मंदिराच्या पाडकामाची नोटीस आदित्य ठाकरेंच्या महाआरतीपूर्वीच रद्द, दुपारी नोटीसला स्थगिती, संध्याकाळी आदित्य ठाकरेंकडून महाआरती https://tinyurl.com/yn7ze4vu भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व एक्स्पोज केलं, आदित्य ठाकरेंची टीका https://tinyurl.com/ybcv84xx
*4*. दादरच्या हनुमान मंदिराबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, किरीट सोमय्या मंदिरात गेल्यानंतर शिवसैनिक आक्रमक https://tinyurl.com/yz4z92bv आम्ही उद्धव ठाकरेची सेना नाही, ज्याने बापाचं नाव बुडवलं, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून किरीट सोमय्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/2s3c6vvf
*5*. बीडच्या वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल असून तो खुला फिरतोय, सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अजितदादांनी धनंजय मुंडेंना मंत्री करु नये, बीड हत्याप्रकरणावरुन संभाजीराजे संतापले https://tinyurl.com/4zy68c9f मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपी अजूनही मोकाट, पोलिसांच्या भूमिकेवर संशय, राजकीय दबावातून दिरंगाई होत असल्याची चर्चा https://tinyurl.com/47sr4pb4
*6*. बेडअभावी 43 महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवल्याने चहूबाजूंनी टीका, हिंगोलीतील बाळापूर ग्रामीण रूग्णालयातील कॉटची संख्या वाढवली https://tinyurl.com/4k7e7f28 रुग्णांना जमिनीवर झोपवलेल्या डॉक्टरांची आमदार संतोष बांगरांकडून पाठराखण, डॉक्टर अतिशय कर्तव्यदक्ष असल्याचं सर्टिफिकेटही दिलं https://tinyurl.com/37283r5t
*7*. देशभर पेपर लीक करा, सगळीकडे मक्तेदारी करा असं संविधानात लिहिलेलं नाही, लोकसभेतील चर्चेत एकलव्याची कथा सांगत राहुल गांधींची मोदी-अदानींवर चौफेर टीका https://tinyurl.com/yjmbjr5c उत्तर प्रदेशात संविधान नव्हे तर मनुस्मृती लागू, जातीय जनगणना करून दाखवून देऊ कोणाचा किती अंगठा कापला, राहुल गांधींचा जोरदार प्रहार https://tinyurl.com/mft2tdan
*8*. उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी, विदर्भातही बोचरी थंडी, गोंदियात आज 6.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद https://tinyurl.com/ns4j5yfj पूर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज https://tinyurl.com/fmfa6jhe
*9*. छत्रपती संभाजीनगरहून माहूरकडे जाणाऱ्या बस आणि कंटेनर ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात बसमधील 2 प्रवासी जागीच ठार तर 20 जण जखमी https://tinyurl.com/5day8np3
*10*. भारत-ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पावसाचा हाहाकार, गाबाचे मैदान बनले तलाव, पहिल्या दिवसाचा खेळ रद्द https://tinyurl.com/dp3b8ucm पाऊस करणार टीम इंडियाचा गेम, गाबा कसोटी ड्रॉ झाल्यास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील समीकरण बिघडणार https://tinyurl.com/53jv9dkz
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w