स्मार्ट बुलेटिन | 05 ऑगस्ट 2021 | गुरुवार | एबीपी माझा
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये घेतला जातो. सकाळच्या वेळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. यात महत्वाच्या दहा हेडलाईन्सचा समावेश असतो...
भारतीय हॉकी संघानं रचला इतिहास, कांस्यपदकावर शिक्कामोर्तब, 41 वर्षानंतर हॉकीत पदकाचा दुष्काळ संपवला
पेगॅसिस प्रकरणी आज महत्वाचा दिवस... चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
SEBC मध्ये नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना, केंद्रीय कॅबिनेटमध्ये महत्वाचं विधेयक मंजूर
राज्याला आरक्षणाचा अधिकार देऊन केंद्राने काय साध्य केलं? मंत्री अशोक चव्हाण यांचा संतप्त सवाल
राज्यात काल 6126 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 7436 रुग्ण कोरोनामुक्त
परप्रांतीय प्रवाशांवर निर्बंध नाहीत, मग लोकल प्रवाशांवर का? मुंबईकरांचा संतप्त सवाल
अँटिलिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरण, सचिन वाझेसह काझी आणि मानेच्या जामीन अर्जावर आज निर्णय
पुण्यात दोन कोटी रुपये खर्चून प्रभू श्रीरामांचं शिल्प बनवण्याबाबत ठराव मंजूर, विरोधी पक्षांचा भाजपवर आरोप
शेगाव संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन, सर्व स्तरातून हळहळ
भारत-इंग्लंड कसोटीत भारताचा दबदबा, पहिल्या दिवशी इंग्लंडचा डाव 183 धावांवर गुंडाळला