Latur Crime: वंलांडीतील घटनेनं लातूर हादरलं; अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज लातूर बंद, आंदोलकांच्या मागण्या काय?
Latur Crime: लातूर जिल्ह्यातील मौजे वलांडी येथील एका 6 वर्ष वयाच्या लहान मुलींवर निर्दयी आरोपीनं 4 ते 5 दिवस अत्याचार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ लातुरात बंद पुकारण्यात आला आहे.
Maharashtra Latur Crime News : लातूर : लातुरातील (Latur Crime News) वलांडीत (Walandi) घडलेल्या अमानुष घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. वलांडी येथील अमानुष घटनेच्या निषेधार्थ लातूर शहरात आज बंद आणि आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. तसेच, शहर हादरवणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ शहरातील मुख्य बाजारपेठ असलेली गंज गोलाई बंद करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातील मौजे वलांडी येथील एका 6 वर्ष वयाच्या लहान मुलींवर निर्दयी आरोपीनं 4 ते 5 दिवस अत्याचार केला होता. त्याबाबत कलम 376 अ, ब 2एन, 377,506 अट्रोसिटी 3(1), डब्लू,3(2), तसेच बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 4,6 अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.पीडित कुटुंबात वयोवृद्ध आजारानं ग्रस्त सासू, सासरे, एक विधवा महीला आणि त्यांच्या 4 लहान मुली, एक लहान मुलगा असा परिवार असून सर्व कुटुंबियांचा उदरनिर्वाह पीडितेच्या विधवा आईवरच आहे. पीडितेची आई मोलमजुरी करून उदनिर्वाह भागवते. याचे पडसाद जिल्हाभरात नव्,हे तर राज्यात उमटत आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज हिंदू जनजागरण मार्च आयोजित करण्यात आला आहे.याची सुरुवात गंज गोलाई येथील मुख्य चौकातून होणार आहे.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या
- पीडित आणि आरोपीचे घर एकमेकांच्या समोर आहे त्यामुळे पिडीत कुटुंबाची सोय इतरत्र करावी अथवा पिडीत कुटुंबीयास पोलीस संरक्षण देण्यात यावे.
- पीडित कुटुंबीयास शासनाच्या वतीने योग्य ती आर्थिक मदत करण्यात यावी
- पीडित बालिकेच्या पुनर्वसनाचा (शैक्षणिक आदी) संपूर्ण खर्च शासनाने उचलावा
- सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा
- पीडित कुटुंबियात अल्पवयीन 4 मुली, 1 मुलगा असल्याने त्यांना बाल संगोपन योजने अंतर्गत (विशेष बाब म्हणून) सर्वांना मदत करण्यात यावी
- पीडितेच्या आईला शासकीय, निमशासकीय नौकरीत सामावून घेण्यात यावे अथवा सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय शेत जमीन देण्यात यावे
- संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आरोपीला आणि कुटुंबीयांना गावबंदी करण्यात यावी जेणेकरून गावात धार्मिक/जातीय तेढ अथवा तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावी.
- या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज हा मार्च आयोजित करण्यात आला आहे. जगदंबा मंदिर गंज गोलाई लातूर पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथ पर्यंत हिंदु आक्रोश मोर्चा पोहचून जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रशासनास लहान मुलीच्या वतीने निवेदन वाचन करून, निवेदन देवुन सांगता होणार आहे.
नेमकं काय घडलं?
वलांडी या गावातील एका सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली. याच गावातील अल्ताफ महेबूब कुरेशी या युवकांनी घराशेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर काही दिवसांपासून लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली. सदर मुलीनं आपल्या आईला अत्याचाराबाबत माहिती दिली. अत्याचार ग्रस्त मुलीच्या वडिलांचं निधन काही वर्षांपूर्वी झालं आहे. याबाबत पालकांनी देवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी देवणी पोलीसात भारतीय दंड संहीता पोक्सो आणि ऑट्रॅसीटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कलम 376 ए.बी. 376 (2) 377 506 अनुसूचीत जाती जमाती 1989 नुसार 3 (1) डब्लू (1), 3 (2) , 3 बालकांचे लैगींक अपराध संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत कलम 4 आणि 6 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.