Latur Crime : रुग्णालयातील महिलांचे सीसीटीव्ही पैशांसाठी सोशल मीडियावर व्हायरल केले, पोलिसांनी लातूरमधून एकाला अटक
Latur Crime : रुग्णालयातील महिलांचे सीसीटीव्ही लीक करुन सोशल मीडियावर व्हायरल केले, पोलिसांनी लातूरमधून एकाला ताब्यात घेतलं आहे.

Latur Crime : रुग्णालयातील महिलांचे व्हिडिओ सीसीटीव्हीच्या माध्यमातून लीक करुन समाज माध्यमावर व्हायरल केल्याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यातील एकाला लातुरातून ताब्यात घेतले आहे. तो मुळचा सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील आहे. गुजरातमधील राजकोटच्या महिला रुग्णालयातील प्रकार काही दिवसापूर्वी उघड झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती.
सोशल मीडियावर व्हिडीओंची विक्री, सांगलीतील तरुणही रॅकेटमध्ये
गुजरात येथील स्त्री रुग्णालय तसेच सार्वजनिक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करुन महिलांचे व्हिडीओ एकत्र करण्यात आले होते. त्यानंतर हे व्हिडिओ वेगवेगळ्या डार्क साईटवर तसेच युट्यूब चॅनलवर अपलोड केले जात होते. काही दिवसांपूर्वी गुजरात पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला. अहमदाबादच्या सायबर सेलकडून तपास सुरू असताना त्यांना लिंक मिळाली.. व्हाट्सअॅप आणि टेलिग्राम या सोशल माध्यमाच्या द्वारे व्हिडिओची विक्री केली जात असल्याचे समोर आलं. त्याचं कनेक्शन लातूर येथे असणाऱ्या एका तरुणापर्यंत आलं..
अहमदाबाद येथील सायबर सेलची लातूरमध्ये मोठी कारवाई
अहमदाबाद येथील सायबर सेलचे पोलीस कर्मचारी लातूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं.."गुरुवारी सकाळी अहमदाबादचे पोलीस लातुरात दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने त्यांनी नंदी स्टॉपजवळील नारायण नगर येथून प्रज्वल तैली यास ताब्यात घेतले" अशी माहिती पोलीस अधिकारी विश्वंभर पल्लेवाड यांनी दिली आहे.
प्रज्ज्वल तैली हा मूळचा सांगली जिल्ह्यातील जत येथील आहे.. प्रज्ज्वल हा नीट परिक्षेच्या तयारीसाठी लातुरात आला होता. या परिक्षेची तयारी करीत असताना मित्राच्या संगतीने बेकायदेशीर व्हिडिओ चोरत होता. त्याने ८० हून अधिक व्हिडिओ हे युट्यूबरवर अपलोड केले होते. त्याबदल्यात तो चांगले पैसेही कमावत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिकच्या तपासासाठी प्रज्ज्वल तेली यास अहमदाबादच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सांगली जिल्ह्यातीलच प्राज पाटील आणि प्रयागराजमधील चंद्रप्रकाश फुलचंदलाही अटक करण्यात आली आहे.
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?https://t.co/eo6saxet77
— ABP माझा (@abpmajhatv) February 21, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
