पोटाला थंडावा मिळण्यासाठी लोक फळे विचार न करता फ्रीजमध्ये ठेवतात.
फ्रीजमध्ये फळे ठेवल्यास त्या जास्त काळ ताज्या राहतात असा काही लोकांचा गैरसमज असतो.
काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने ते विषारी ठरू शकतात.
कलिंगड हे फळ आकाराने मोठे असते. कलिंगडला एकाच वेळी खाणे कठीण होते. अशा परिस्थितीत लोक फ्रीजमध्ये कलिंगड कापून ठेवतात, जे चुकीचे आहे. यामुळे अँटिऑक्सिडंट्स नष्ट होतात. तुम्ही त्यांना खाण्यापूर्वी अर्धा तास ठेवू शकता.
आंबा फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील अँटीऑक्सिडंट्स कमी होतात आणि पोषक तत्वेही नष्ट होतात. म्हणूनच फ्रीजमध्ये आंबे कधीही ठेवू नका.
बहुतेक घरांमध्ये सफरचंद फ्रीजमध्ये ठेवले जातात. फ्रीजमध्ये सफरचंद लवकर खराब होत नाहीत पण त्यातील पोषक घटक कमी होतात. त्यामुळे सफरचंद फ्रीजमध्ये ठेवू नका. सफरचंद जास्त काळ खराब होऊ नये म्हणून कागदात गुंडाळून ठेवा.
लिची फ्रीजमध्ये ठेवल्याने लवकर खराब होते. थंड आणि रसाळ लिची उन्हाळ्यात चवदार असते, परंतु आपण ते फ्रीजमध्ये ठेवण्याचे टाळले पाहिजे. फ्रीजमध्ये ठेवल्याने लिचीचा वरचा भाग तसाच राहतो पण लिची आतून वितळू लागते.
केळी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास ती खराब होतात. केळीच्या देठातून इथिलीन वायू बाहेर पडतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.