एक्स्प्लोर

Sangli Accident: विरुद्ध दिशेने वीटा घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये बोलेरो घुसली; मिरजमधील भीषण अपघातात कोल्हापुरातील एकाच कुटुंबातील 5 जणांचा अंत

बोलेरोमधील एकाच कुटुंबातील सर्वजण कोल्हापूरहुन पंढरपूरच्या दिशेने चालले होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या  ट्रॅक्टरला बोलेरोची धडक बसली.बोलेरो समोरून पूर्णपणे ट्रॅक्टरच्या समोरच्या भागात घुसली.

Sangli Accident : अवघ्या दोन दिवसांपूर्वी मिरजपासून सुरु झालेल्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर चालकाच्या बेदरकारपणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा करुण अंत झाला. या अपघातात सरवडेमधील जयवंत पवार (वय 45 वर्षे) सोहम पवार (वय 12 वर्षे), कोमल शिंदे (वय 60 वर्षे), लखन शिंदे (वय 60 वर्षे) आणि बोलेरो चालकाचा जागीच अंत झाला. जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामधील शिंदे दाम्पत्य हे जयवंत पवार यांचे सासू सासरे आहेत. त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. 

मिरजजवळील वड्डी गावाजवळ रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पंढरपूरच्या दिशेने देवदर्शनासाठी चाललेली बोलेरो गाडी आणि विरुद्ध दिशेने येत असलेल्या विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. आज (17 मे) जयवंत पवार पत्नी, दोन मुले आणि सासू सासऱ्यांसह पंढरपूला देवदर्शनासाठी सरवडेतून गाडी भाड्याने करुन निघाले होते. त्यांनी राधानगरी तालुक्यातील शेळेवाडीमधील बोलेरी गाडी (MH-09-DA-4912) देवदर्शनासाठी बुक केली होती. 

कसा झाला अपघात?

बोलेरो पंढरपूरच्या दिशेने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरला समोरुन धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, बोलेरो समोरुन पूर्णपणे ट्रॅक्टरच्या समोरच्या भागात घुसली. बोलेरो गाडीतील मयत हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सरवडे गावामधील आहेत. मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी-नागपूर माहमार्गावर वड्डी गावाच्या हद्दीत बोलरे गाडी पोहोचली असता राँग साईडने विटांनी भरलेला ट्रॅक्टर अचानक समोर आला. यावेळी भरधाव असणारी बोलेरो समोरुन येणाऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी महामार्ग पोलिसांनी तत्परता दाखवली. अपघाताची माहिती समजताच सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली, पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

अपघात झाल्याचे समजताच गावकऱ्यांना धक्का

दरम्यान, सकाळी देवदर्शनासाठी निघालेल्या पवार कुटुंबाचा मिरजेत भीषण अपघात झाल्याचे समजताच सरवडेमधील गावकऱ्यांना सुद्धा धक्का बसला. या घटनेनंतर गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले. अपघातग्रस्त पवार कुटुंबीयांचे नातेवाईक सांगलीच्या दिशेने रवाना झाले आहेत. दुसरीकडे ज्या ठिकाणी अपघात झाला तो टप्पा दोन दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अपघात झाला आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime: खडी केंद्रातील मुकादमाचे अनैतिक संबंध, महिलेच्या नवरा अन् मुलाने डोक्यात कोयता घालून संपवलं, रक्ताने माखलेल्या कपड्यांवर रस्त्यावर धावत सुटले
मुकादमाचे अनैतिक संबंध, महिलेच्या नवरा अन् मुलाने डोक्यात कोयता घालून संपवलं, रक्ताने माखलेल्या कपड्यांवर रस्त्यावर धावत सुटले
मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, सीएम फडणवीस म्हणाले, उत्तराधिकारी निवडण्याची वेळ...
मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, सीएम फडणवीस म्हणाले, उत्तराधिकारी निवडण्याची वेळ...
Raigad Crime News : सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
Ram Shinde : वाचाळवीरांवर कठोर कारवाईसाठी कायदे करावेच लागणार; राम शिंदेंचा उदयनराजेंच्या मागणीला पाठिंबा; म्हणाले, राज्य सरकार...
वाचाळवीरांवर कठोर कारवाईसाठी कायदे करावेच लागणार; राम शिंदेंचा उदयनराजेंच्या मागणीला पाठिंबा; म्हणाले, राज्य सरकार...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis on Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करु : फडणवीसABP Majha Marathi News Headlines 12 Noon TOP Headlines 12 Noon 31 March 2025Sanjay Raut PC : राज ठाकरेंचं भाषण ते नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा; संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 31 March 2025 : 11 AM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Crime: खडी केंद्रातील मुकादमाचे अनैतिक संबंध, महिलेच्या नवरा अन् मुलाने डोक्यात कोयता घालून संपवलं, रक्ताने माखलेल्या कपड्यांवर रस्त्यावर धावत सुटले
मुकादमाचे अनैतिक संबंध, महिलेच्या नवरा अन् मुलाने डोक्यात कोयता घालून संपवलं, रक्ताने माखलेल्या कपड्यांवर रस्त्यावर धावत सुटले
मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, सीएम फडणवीस म्हणाले, उत्तराधिकारी निवडण्याची वेळ...
मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, सीएम फडणवीस म्हणाले, उत्तराधिकारी निवडण्याची वेळ...
Raigad Crime News : सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
Ram Shinde : वाचाळवीरांवर कठोर कारवाईसाठी कायदे करावेच लागणार; राम शिंदेंचा उदयनराजेंच्या मागणीला पाठिंबा; म्हणाले, राज्य सरकार...
वाचाळवीरांवर कठोर कारवाईसाठी कायदे करावेच लागणार; राम शिंदेंचा उदयनराजेंच्या मागणीला पाठिंबा; म्हणाले, राज्य सरकार...
Raj Thackeray : उठ मराठ्या जागा हो, तुमची फक्त माथी भडकावत आहेत, तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते; राज ठाकरेंनी 'महाराष्ट्र धर्मात' अंगार भरला!
उठ मराठ्या जागा हो, तुमची फक्त माथी भडकावत आहेत, तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते; राज ठाकरेंनी 'महाराष्ट्र धर्मात' अंगार भरला!
Shirdi Airport : आनंदाची बातमी! अखेर शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी ठरणार केंद्रबिंदू
आनंदाची बातमी! अखेर शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी ठरणार केंद्रबिंदू
पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
Embed widget