Kolhapur Crime : तीन मुलांना सोडून फरार झालेल्या बायकोचं प्रियकरासोबत लग्न, फोटो पाहताच नवऱ्याकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
बायकोचे प्रियकरासोबतचे दुसऱ्या लग्नाचे फोटो पाहून मुळापासून हादरलेल्या नवऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कोल्हापूर (Kolhapur Crime) शहराला लागून असलेल्या एका गावामध्ये घडली.
Kolhapur Crime : तीन मुलं पोटाला असूनही पाच महिन्यांपूर्वी फरार झालेल्या बायकोचे प्रियकरासोबतचे दुसऱ्या लग्नाचे फोटो पाहून मुळापासून हादरलेल्या नवऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कोल्हापूर शहराला लागून असलेल्या एका गावामध्ये घडली. बायकोनं स्वत: दुसऱ्या लग्नाचे फोटो नवऱ्याच्या मोबाईलवर पाठवून दिल्याने पती अत्यंत निराश झाला होता. त्यामुळे स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्याच्या तीन मुलांनी आजीच्या मदतीसह वडिलांना सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर कालही पुन्हा झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिन्ही मुलं यावेळी चिंताग्रस्त होऊन रुग्णालय परिसरात फिरत असताना अनेकांचे मन हेलावले. यानंतर त्या मुलांच्या आतीने येऊन मुलांना आधार दिला.
या दाम्पत्याला तीन मुलं आहेत. तिन्ही मुलांसह मोलमजुरी करून सुखाने संसार सुरु असतानाच पत्नीचे एकाशी संबंध सुरु झाले. या संबंधातूनच पतीने प्रियकरासोबत पाच महिन्यांपू्वी पलायन केले. यानंतर पत्नी हरवल्याची तक्रारही पतीने केली होती,पण पोलिसांकडून योग्य तपास झाला नसल्याचे त्याने सांगितले. पत्नीने पळून गेलेल्या प्रियकरासोबत लग्न केल्याचे फोटो पतीच्या मोबाईलवर पाठवून दिले होते. त्यामुळे पतीला चांगलाच धक्का बसला. त्यामुळे निराश झालेल्या पतीने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.
पळून जाताना मुलांचाही विसर पडला
तीन मुलांसह संसार सुरु असतानाच प्रियकरासोबत पळून जाताना आपल्या मुलांचाही विसर पडला. गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या त्या महिलेनं थेट दुसरं लग्न केल्याचे फोटो पाठवून दिल्याने त्या मुलांचाही विसर पडला. त्यामुळे निराश झालेल्या पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Satej Patil : विरोधकांनी बोलूच नये, आम्ही जे करतो तेच होय म्हणावे, अशा पद्धतीचा प्रयत्न सुरु, सतेज पाटलांचा मोदी सरकावर हल्लाबोल
- Raju Shetti : राजू शेट्टींसाठी शेतकऱ्यांचे काय पण ! आधी वर्गणी काढून खासदार केले आणि आता नवी कोरी फॉर्च्युनर दिली भेट
- Samarjeetsinh Ghatge : हसन मुश्रीफ तुमचं सरकारमध्ये राजकीय वजन आहे की नाही ? अजित पवार, जयंत पाटील सांगूनही कागलला आले नाहीत