Satej Patil : विरोधकांनी बोलूच नये, आम्ही जे करतो तेच होय म्हणावे, अशा पद्धतीचा प्रयत्न सुरु, सतेज पाटलांचा मोदी सरकावर हल्लाबोल
विरोधकांनी बोलून बोलूच नये आम्ही जे करतो ते होय म्हणावं अशा पद्धतीचा प्रयत्न सुरु असल्याची टीका कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील (Satej patil) यांनी केली आहे.
Kolhapur : स्वातंत्र्यांच्या 75 वा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत, पण देशाची वाटचाल लोकशाहीतून हुकूमशाहीकडे चालली आहे का अशी शंका येते. विरोधकांनी बोलून बोलूच नये आम्ही जे करतो ते होय म्हणावं अशा पद्धतीचा प्रयत्न सुरु असल्याची टीका पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील (Satej patil) यांनी केली आहे. त्यांनी आज कोल्हापूरमध्ये एबीपी माझाशी संवाद साधतताना मोदी सकरकावर चांगलाच हल्ला चढवला. 0
पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांवर अशा पद्धतीची कारवाई करून या देशातील कुठल्याही विरोधी पक्षाने बोलू नये, किंबहुना येणारी राष्ट्रपतीची निवडणूक आहे, त्यामध्ये काही होऊ नये यासाठी या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहे. तरी मला वाटते सुडाचे राजकारण फार दिवस या देशांमध्ये चालेल असं मला वाटत नाही, असेही ते म्हणाले.
लोकशाहीचा आदर्श घेत होते, आज त्यांना ही शंका वाटते
100% आपण लोकशाही म्हणून जगाच्या पाठीवर भारताला ओळखले जातात. 30 कोटी लोकसंख्या लोकसंख्या असलेला देश आज 120 कोटी वर पोचला तरी जगाच्या पाठीवर भारताची लोकशाही प्रबळ आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर चाललेला आहे. परंतु, आज या लोकशाहीमध्ये नेमकं काय चाललंय, लोकशाहीचा आदर्श घेत होते आज त्यांना ही शंका वाटते की या लोकशाहीमध्ये असे घडू शकतं ? हे आपल्या दृष्टीने देखील वाईट आहे. कारण जागतिक पातळीवर सुद्धा याचे परिणाम दिसणारच या देशांमध्ये अशा पद्धतीचे सुडाचे राजकारण होत असेल तर उद्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून देशातील इन्वेस्टमेंट असलेल्या सगळ्या गोष्टींवर याचा परिणाम होऊ शकतो, होणार नाही असे म्हणता येणार नाही, त्यामुळे याचा विचार करून हे सगळं थांबलं पाहिजे आणि याला पूर्णविराम देण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि सुडाचे राजकारण बंद केला पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.
एखादं राज्य सीबीआय आपल्या राज्यात येऊ नये म्हणून निर्णय घेत, असेल तर किती अविश्वास निर्माण झाला आहे हे दिसून येतं. हे देशाच्या दृष्टीने घातक आहे. चुकीच्या कारवाई होतात हे स्पष्टपणे त्या राज्यांना वाटू लागलं आहे. देश म्हणून याचा विचार केला पाहिजे त्या केंद्रीय एजन्सींचा वापर कशासाठी केला गेला पाहिजे याचा तारतम्य राहिले पाहिजे नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या