एक्स्प्लोर

टाटा मोटर्स देणार फास्‍ट-चार्जिंगच्या 250 स्‍टेशन्‍सची सुविधा, सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी

Tata Motors : दिल्‍ली, मुंबई, चेन्‍नई, बेंगळुरू, पुणे आणि कोचीसह 50 हून अधिक शहरांमध्‍ये फास्‍ट-चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. 

मुंबई: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज घोषणा केली की, कंपनी डेल्‍टा इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंडिया आणि थंडरप्‍लस सोल्‍यूशन्‍स प्रा. लि. सोबत सहयोग करत आहे. याअंतर्गत देशभरात 250 नवीन फास्‍ट चार्जिंग स्‍टेशन्‍स स्‍थापित करत त्‍यांच्‍या इलेक्ट्रिक व्‍यावसायिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधा विस्‍तारित करण्‍यात येतील. दिल्‍ली, मुंबई, चेन्‍नई, बेंगळुरू, पुणे आणि कोचीसह 50 हून अधिक शहरांमध्‍ये धोरणात्‍मकरित्‍या स्थित हे नवीन चार्जिंग स्‍टेशन्‍स 540 व्‍यावसायिक वाहन चार्जिंग पॉइण्‍ट्सच्‍या विद्यमान नेटवर्कमध्‍ये लक्षणीयरित्‍या वाढ करतील.

ई-कॉमर्स कंपन्‍या, पार्सल व कूरियरसेवा प्रदाता, तसेच इतर उद्योग त्‍यांचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्‍याच्‍या उद्देशाने लास्‍ट-माइल डिलिव्‍हरींसाठी व्‍यावसायिक ईव्‍हींचे अवलंबन वाढवत आहेत. व्‍यावसायिक ईव्‍ही मूव्‍हमेंटबाबत माहितीच्‍या आधारावर टाटा मोटर्स हे फास्‍ट-चार्जिंग स्‍टेशन्‍स स्‍थापित करण्‍यासाठी सानुकूल लोकेशन्‍स आणि जवळच्‍या डिलरशिप्‍सची शिफारस करेल. डेल्‍टा इलेक्‍ट्रॉनिक्‍स आवश्‍यक हार्डवेअरचा पुरवठा करेल, तर थंडरप्‍लस सोल्‍यूशन्‍स त्‍यांना इन्‍स्‍टॉल करण्‍यासोबत ऑपरेट करेल.

या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या एससीव्‍ही अँड पीयूचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. विनय पाठक म्‍हणाले, ''आमचा उत्‍सर्जन-मुक्‍त कार्गो परिवहन सहजपणे उपलब्‍ध करून देण्‍याचा प्रयत्‍न आहे. महामार्गांवर चार्जिंग पायाभूत सुविधा अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून दिल्‍याने अधिकाधिक ग्राहक इलेक्ट्रिक व्‍यावसायिक वाहनांचा अवलंब करण्‍यास प्रेरित होतील आणि वेईकल अपटाइममध्‍ये सुधारणा होऊन उच्‍च उत्‍पन्‍न व सर्वोत्तम नफ्याची खात्री मिळेल, तसेच शुद्ध, हरित पर्यावरणाप्रती योगदान देता येईल. आमच्‍या डिलरशिपमध्‍ये फास्‍ट चार्जर्स स्‍थापित केल्‍याने त्‍यांना ओळखीच्‍या ठिकाणी विश्‍वसनीय चार्जिंग सुविधा मिळतील.''

लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. निरंजन नायक म्‍हणाले, "डेल्‍टाचा उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण, शुद्ध आणि ऊर्जा-कार्यक्षम सोल्‍यूशन्‍स देण्‍याचा मनसुबा आहे. टाटा मोटर्स आणि थंडरप्‍लससोबतचा हा सहयोग आम्‍हाला भारतातील इलेक्ट्रिक कार्गो इकोसिस्‍टमप्रती मोठ्या प्रमाणात योगदान देण्‍यास सक्षम करतो. आमचे प्रगत चार्जिंग तंत्रज्ञान देशभरातील वापरकर्त्‍यांसाठी इलेक्ट्रिक व्‍यावसायिक वाहन अनुभव वाढवण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावेल."

थंडरप्‍लस सोल्‍यूशन्‍स प्रा. लि. चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. राजीव वायएसआर म्‍हणाले, ''आम्‍हाला या उल्लेखनीय उपक्रमासाठी टाटा मोटर्स आणि डेल्‍टासोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. सोयीसुविधा व विश्‍वसनीयतेची खात्री देणाऱ्या उच्‍च-स्‍तरीय चार्जिंग सोल्‍यूशन्‍ससह इलेक्ट्रिक व्‍यावसायिक वाहन ग्राहकांना सक्षम करण्‍यावर आमचा भर आहे. हा सहयोग भारतभरात शाश्‍वत परिवहन सोल्‍यूशन्‍सना चालना देण्‍यासाठी आमच्‍या मिशनशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे. हा उपक्रम पूर्णपणे आमची मोहिम #HarGharThunder शी बांधील आहे, ज्‍याद्वारे आमचा चार्ज पॉइण्‍ट किफातशीर करून देण्‍याचा, तसेच इलेक्ट्रिक वेईकल चार्जिंग सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे चार्जिंगसंदर्भातील चिंता दूर होईल.''

टाटा मोटर्स लास्‍ट-माइल डिलिव्‍हरींसाठी भारतातील सर्वात प्रगत चार-चाकी ई-कार्गो सोल्‍यूशन 'एस ईव्‍ही' देते. या वेईकलला देशभरातील १५० हून अधिक इलेक्ट्रिक वेईकल सर्विस सेंटर्सचे पाठबळ आहे. या वेईकलमध्‍ये प्रगत बॅटरी मॅनेजमेंट सिस्‍टम, फ्लीट एज टेलिमॅटिक्‍स सिस्‍टम आणि दर्जात्‍मक अपटाइमसाठी प्रबळ अॅग्रीगेट्स आहेत. टाटा युनिव्‍हर्सच्‍या व्‍यापक क्षमतांचा फायदा घेत एस ईव्‍ही संबंधित टाटा ग्रुप कंपन्‍यांसोबतच्‍या सहयोगांचा, तसेच देशातील आघाडीच्‍या फायनान्शियर्ससोबतच्‍या भागीदारांचा फायदा घेते आणि ग्राहकांना सर्वांगीण ई-कार्गो मोबिलिटी सोल्‍यूशन देते. एस ईव्‍ही देशभरातील सर्व टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल डिलरशिप्‍समध्‍ये खरेदी करता येऊ शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : हिंदू - मुस्लिमांमध्ये भांडणं लावणाऱ्या भाजपने सांगावं की हिंदूत्ववाद सोडला...Uddhav Thackeray on Saugat-e-Modi : बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगाते मोदी देणारShivsena Uddhav Thackeray PC : भाजपने हिंदुत्व सोडलं असं जाहीर करावं, ठाकरेंची सडकून टीकाNashik Trimbakeshwar Kumbhकुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा?साधूमहंतांचं म्हणणं काय?Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Prakash Ambedkar: देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
Embed widget