रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधन, अन्न आणि खतांचे संकट; जाणून घ्या काय म्हणाले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर
S Jaishankar on Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधन, अन्न आणि खतांचे संकट निर्माण झाले आहे, ज्यामुळे उपासमारीची परिस्थिती उद्भवू शकते, असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले आहेत.
S Jaishankar on Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधन (Petrol Diesel), अन्न (Food Crisis) आणि खतांचे (Fertilizer) संकट निर्माण झाले आहे, ज्यामुळे उपासमारीची (Hunger) परिस्थिती उद्भवू शकते, असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) म्हणाले आहेत. नरेंद्र मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'राष्ट्रीय सुरक्षा' या विषयावरील चर्चेदरम्यान जयशंकर असे म्हणाले आहेत.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, इंधन, अन्न आणि खतांच्या किमती खूप वाढल्या आहेत. यावर महागाईचे बरेच परिणाम झाले आहेत. इंटरनॅशनल स्टडीज नेटवर्क, बंगळुरू यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीजने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
रशिया-युक्रेन युद्धावर एस जयशंकर काय म्हणाले?
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, अन्नधान्याच्या बाबतीत खरोखरच उपासमारीची परिस्थिती निर्माण होईल. हे युद्ध असेच सुरू राहिल्यास खतांच्या बाबतीत, भविष्यात किंवा पुढील कापणीच्या हंगामापर्यंत अनेक देशांमध्ये एक मोठी समस्या निर्माण होईल. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत देशाने अनेक मोठ्या आव्हानांना तोंड दिले आहे.
एस जयशंकर (S Jaishankar) म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत देशाने चार मोठ्या आव्हानांचा सामना केला आहे. यामध्ये कोविड-19 (Covid-19) , प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबतचा (China) तणाव, अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि युक्रेनचे संकट (Ukraine Crisis) यांचा यात समावेश आहे. ते म्हणाले की, या चार घटनांनी हे सिद्ध केले की, दूरवर घडणाऱ्या गोष्टींचा थेट परिणाम आपल्या देशावरही होऊ शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या:
पणजीत आज 'बाजारातून संपत्ती निर्माण' या विषयावर परिषदेचं आयोजन, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहभागी होणार
Petrol-Diesel Price Today 10 June 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी वाढ, देशात पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार?
Rajya Sabha Election: चार राज्यांतील 16 राज्यसभेच्या जागांचा फैसला आज; प्रत्येक मतासाठी चुरस, पक्षांची गणितं काय?