एक्स्प्लोर
Advertisement

रोहित वेमुलाच्या कुटुंबीयांकडून बौद्ध धर्माचा स्वीकार

मुंबई: हैदराबाद विद्यापीठा आत्महत्या केलेल्या रोहित वेमुलाच्या आई आणि भावानं बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
दादरच्या आंबेडकर भवनात डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत रोहितची आई राधिका आणि भाऊ राजाने हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारला.
रोहित वेमुला हा हैदराबाद विद्यापीठात पीएचडी करणारा विद्यार्थी होता. 17 जानेवारी रोजी त्यानं विद्यार्थी संघटनांच्या राजकारणातून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येनंतर देशातलं राजकीय आणि सामाजिक जीवन ढवळून निघालं होतं.
वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी सरकारला दोषी धरत देशभरात आंबेडकरवादी आणि डाव्या संघटनांनी आंदोलनं केली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
