एक्स्प्लोर
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
IPO News : गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारात येत असलेल्या आयपीओच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला जातो. 2024 मध्ये आयपीओतून अनेकांनी चांगली कमाई केली.

आयपीओ अपडेट
1/5

भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. मुंबईतील एका कंपनीचा एसएमई आयपीओ देखील येत्या काही दिवसांमध्ये एनएसई इमर्जवर लिस्ट होणार आहे.
2/5

मुंबईतील इएमए पार्टनर्स इंडिया कंपनीनं 76 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणणार असल्याची घोषणा केली. या कंपनीचा एसएमई आयपीओ एनएसई इमर्ज या प्लॅटफॉवरवर लिस्ट होईल.
3/5

इएमए पार्टनर्स इंडिया कंपनीचा एसएमई आयपीओ 17 जानेवारीला बोली लावण्यासाठी खुला होईल. आयपीओचा किंमतपट्टा 117-124 रुपयांदरम्यान असेल. तर, अँकर इन्वेस्टर्स 16 जानेवारी रोजी बोली लावू शकतात. एका लॉटमध्ये 1000 शेअर असतील.
4/5

इएमए पार्टनर्स इंडिया कंपनी आयपीओच्या माध्यमातून 66.14 कोटी रुपयांचे 53.34 लाख इक्विटी शेअर जारी करेल. तर, प्रमोटर्सकडून 7.96 लाख शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले जातील.
5/5

कृष्णन सुदर्शन, सुब्रमण्यम कृष्णप्रकाश हे त्यांच्याकडील शेअर विकणार आहेत. प्रमोटर्सकडे कंपनीचे 86.14 टक्के शेअर आहेत. तर, पब्लिक शेअर होल्डर्सकडे 13.86 टक्के शेअर आहेत. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 12 Jan 2025 08:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
आयपीएल
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion