एक्स्प्लोर

New Parliament Building: 'नव्या संसदेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नाही तर राष्ट्रपतींनी करावं', काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी

New Parliament Building:  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींना करावं असं वक्तव्य केलं होतं. यावर आता भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे.

New Parliament Building:  नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी करण्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करणे चुकीचे असल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. तसेच या 'नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करायला हवं, पंतप्रधानांनी नाही' असं देखील राहुल गांधी म्हणाले आहेत. नव्या संसद भवनाचं काम पूर्ण झाल्यावर त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावं असा आग्रह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केला होता. या संदर्भातली माहिती लोकसभेच्या सचिवालयाकडून गुरुवारी देण्यात आली. 

परंतु राहुल गांधींच्या वक्तव्यावर आता भाजपाकडून पलटवार करण्यात आला आहे. भाजपाचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'नवं संसद भवन उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींचं कोणतही चांगलं काम राहुल गांधी यांना पाहवत नाही.' असं म्हणतं त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.  

काँग्रेसने साधला होता निशाणा

याआधी काँग्रेसने नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणाऱ्या तारखेवर देखील आक्षेप घेतला होता. नवीन संसद भवनाचं उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे. त्याच दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती असते. त्यामुळे '28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणे हा योगायोग आहे की भाजपाची कोणती नवी रणनिती आहे' असा सवाल देखील काँग्रेसकडून विचारण्यात येत आहे. 

तसेच काँग्रेसने नव्या संसद भवनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'व्यक्तीगत महत्त्वकांक्षा असणारी योजना' म्हणत त्याच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. काँग्रेसने या इमारतीवर आक्षेप घेत, 'विरोधकांचा आवाज बंद केला असताना अशा इमारतीची काय गरज आहे' असं देखील म्हटलं होतं. 

संसदेची ही नवी इमारत चार मजली असून त्याला सहा प्रवेशद्वार आहेत. त्यामध्ये लोकसभेचे एक हजार तर राज्यसभेचे 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था आहे. नव्या संसदेमध्ये प्रत्येक खासदाराच्या समोर एक छोटेखानी टेबल असून त्यावर सर्व आवश्यक त्या अत्याधुनिक सुविधा आहेत. काही दिवसांपूर्वीच स्वत: पंतप्रधानांनी या कामाचा आढावा घेतला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

भारतरत्न नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 'असा' सन्मान... नव्या संसदेचं उद्धाटन आणि सावरकरांच्या जन्मदिनाचा संबंध, योगायोग की मोदी सरकारची रणनीती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget