'मोदी सरकारनं उद्योगपतींचं 2378760000000 रुपयाचं कर्ज माफ केलं', राहुल गांधींचा दावा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नेहमीच मोदी सरकारवर टीका करत असतात. आज त्यांनी पुन्हा ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.राहुल गांधींनी दावा केला आहे की, यावर्षी मोदी सरकारनं काही उद्योगपतींचं 23 खर्वहून अधिक रुपयांचं कर्ज माफ केलं आहे.
नवी दिल्ली: काँग्रेसकडून सतत मोदी सरकारवर टीका केली जात आहे. सध्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील नेहमीच पंतप्रधान मोदी आणि सरकारवर टीका करत असतात. आता त्यांनी पुन्हा ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधींनी दावा केला आहे की, यावर्षी मोदी सरकारनं काही उद्योगपतींचं 23 खर्वहून अधिक रुपयांचं कर्ज माफ केलं आहे.
काँग्रेस खासदार आणि माजी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, '2378760000000 रुपयांचं कर्ज या वर्षी मोदी सरकारने काही उद्योगपतींना माफ केलं आहे. या रकमेतून कोविडसारख्या संकटाच्या काळात 11 कोटी परिवारांना प्रत्येकी 20-20 हजार रुपये देऊ शकलो असतो. मोदीजींच्या विकासाचं हे खरं रुप आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
2378760000000 रुपय का क़र्ज़ इस साल मोदी सरकार ने कुछ उद्योगपतियों का माफ़ किया।
इस राशि से कोविड के मुश्किल समय में 11 करोड़ परिवारों को 20-20 हज़ार रुपय दिए जा सकते थे। मोदी जी के विकास की असलियत! — Rahul Gandhi (@RahulGandhi) December 31, 2020
याआधीही राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. अनियोजित लॉकडाउनमुळे कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला होता. एक ट्वीट करत त्यांनी म्हटलं होतं की, "कोरोना संक्रमणाचे रुग्ण आता एक कोटीच्या वर गेलेत. त्यात जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. अनियोजित लॉकडाउनच्या माध्यमातून कोरोना विरोधातली ही लढाई 21 दिवसात जिंकता येते असं पंतप्रधानांनी देशाला सांगितलं होतं. परंतु यामुळं देशातील कोट्यवधी लोकांच जीवन उद्ध्वस्त झालं."
त्यानंतर त्यांनी नोटबंदीवरुन टीका करताना म्हटलं होतं की, पीएम मोदी नोटबंदीच्या वेळी सांगितलं होतं की, मला 50 दिवसाचा वेळ द्या, सर्व ठीक होईल. कोरोनाच्या वेळीही त्यांनी 21 दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र असं काही झालं नाही. राहुल गांधींनी म्हटलं होतं की, पंतप्रधान मोदी यांच्या खोटं बोलण्याचा इतिहास मोठा आहे. त्यामुळं शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीयेत, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं.