एक्स्प्लोर

Video: रेल्वे स्टेशनजवळील हॉटेलमध्ये आगीचा भडका; 6 ठार, 7 गंभीर, 45 जणांचा वाचवला जीव

Fire broke : पाल हॉटेलमधील आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले

पाटणा : बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरात आगीची (Fire) भीषण घटना घडली असून या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेतील जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक (Police) चंद्र प्रकाश यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पाटणा (Patana) स्टेशनपासून जवळच असलेल्या पाल हॉटेलसह तेथील रेस्टॉरंटमध्ये ही आग लागल्याची घटना घडली. आगीच्या घटनेनंतर रेस्टॉरंटमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. 

पाल हॉटेलमधील आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मोठ्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली, पण तोपर्यंत 2 जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर, 20 जण आगीत होरपळले होते. आगीतील जखमींना रुग्णालयात दाखल केले असता, तिथे चार जणांनी दम सोडला. 

आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे आजुबाजूच्या परिसरातील लाईट कट करण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. जवळपास 45 जणांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात जवानांना यश आले, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या प्रमुख शोभा अहोतकर यांनी दिली. आगीत होरपळलेल्या 38 जणांना पाटणा येथील पीएमसीएच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, पाटणा रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच ही दुर्घटना घडल्यामुळे एकच धांदल उडाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अनेकांचे जीव वाचवले, हॉटेलच्या इमारतीत अडकलेल्यांना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.

पाटण्यातील या आगीच्या घटनेचा भयानक व्हिडिओ समोर आला असून आगीत हॉटेल जळून खाक झाले आहे. त्यामध्ये, सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याचेही दिसून येत आहे. पोलीस अधीक्षकांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच, आगीतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास आदेश दिले होते.

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभा नामांकन रद्द करण्याविरोधातील मीनाक्षी नटराजनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; निवडणूक आयोगाचा उमेदवारी रद्दचा निर्णय योग्य की अयोग्य यावर न्यायालयाचे भाष्य नाही
राज्यसभा नामांकन रद्द करण्याविरोधातील मीनाक्षी नटराजनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; निवडणूक आयोगाचा उमेदवारी रद्दचा निर्णय योग्य की अयोग्य यावर न्यायालयाचे भाष्य नाही
Diesel Crisis: ऐन खरिप हंगामातच डिझेल खरेदीवर अटी शर्ती आल्याच! आता एकावेळी किती लिटर डिझेल खरेदी करता येणार?
ऐन खरिप हंगामातच डिझेल खरेदीवर अटी शर्ती आल्याच! आता एकावेळी किती लिटर डिझेल खरेदी करता येणार?
Arun Lakhani on PM Modi : 'महात्मा गांधींनी आवाहन केलं की देश ऐकायचा; मोदींमध्येही तीच ताकद', सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले ?
'महात्मा गांधींनी आवाहन केलं की देश ऐकायचा; मोदींमध्येही तीच ताकद', सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले ?
Devendra Fadnavis: लोक मंदी,मंदी,मंदी बोलत बसलेत, पण आज भारत 94 टक्के कर्ज एका दिवसात फेडू शकतो, तिजोरीत परकीय चलनाचा प्रचंड साठा: देवेंद्र फडणवीस
लोक मंदी,मंदी,मंदी बोलत बसलेत, पण भारत 94 टक्के कर्ज एका दिवसात फेडू शकतो, तिजोरीत परकीय चलनाचा प्रचंड साठा: देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: अंगावर काटा आणणारा अपघात! टाटा सफारीने दुचाकीला चिरडले; पुण्यातील थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद
अंगावर काटा आणणारा अपघात! टाटा सफारीने दुचाकीला चिरडले; पुण्यातील थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद
रोहित पवाराचं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी, कोणी पुतना मावशीचे प्रेम दाखवण्याची गरज नाही, जयकुमार गोरेंचा हल्लाबोल
रोहित पवाराचं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी, कोणी पुतना मावशीचे प्रेम दाखवण्याची गरज नाही, जयकुमार गोरेंचा हल्लाबोल
राज्यसभा नामांकन रद्द करण्याविरोधातील मीनाक्षी नटराजनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; निवडणूक आयोगाचा उमेदवारी रद्दचा निर्णय योग्य की अयोग्य यावर न्यायालयाचे भाष्य नाही
राज्यसभा नामांकन रद्द करण्याविरोधातील मीनाक्षी नटराजनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; निवडणूक आयोगाचा उमेदवारी रद्दचा निर्णय योग्य की अयोग्य यावर न्यायालयाचे भाष्य नाही
New IRCTC Website : एका मिनिटात दीड लाख तिकिटांची बुकिंगची क्षमता, आयआरसीटीसीची नवी वेबसाईट 15 जुलैपासून सुरु होणार, अश्विनी वैष्णव यांची घोषणा 
एका मिनिटात दीड लाख तिकिटांची बुकिंगची क्षमता, आयआरसीटीसीची नवी वेबसाईट 15 जुलैपासून सुरु होणार : अश्विनी वैष्णव
Diesel Crisis: ऐन खरिप हंगामातच डिझेल खरेदीवर अटी शर्ती आल्याच! आता एकावेळी किती लिटर डिझेल खरेदी करता येणार?
ऐन खरिप हंगामातच डिझेल खरेदीवर अटी शर्ती आल्याच! आता एकावेळी किती लिटर डिझेल खरेदी करता येणार?
Latur Farmer : बैल दिला की थट्टा केली? सरकारने दिलेल्या आजारी बैलाने औत लावताच मान टाकली, लातूरच्या शेतकऱ्याची मोठी मागणी 
बैल दिला की थट्टा केली? सरकारने दिलेल्या आजारी बैलाने औत लावताच मान टाकली, लातूरच्या शेतकऱ्याची मोठी मागणी 
Rajesh Exports :सेबीचा अंतरिम अहवालानं राजेश एक्सपोर्टसचा स्टॉक गडगडला, स्पर्धक कंपनीला अच्छे दिन, गोल्डियम इंटरनॅशनलचा शेअर तेजीत
राजेश एक्सपोर्टसचा स्टॉक घसरल्यानं स्पर्धक कंपनीला अच्छे दिन, गोल्डियम इंटरनॅशनलचा शेअर तेजीत
धडक कारवायानंतर तुकाराम मुंढेंना धमक्या, सपोर्टसाठी शेतकरी मैदानात; आटपाडीत प्रतिमेला दुग्धाभिषेक
धडक कारवायानंतर तुकाराम मुंढेंना धमक्या, सपोर्टसाठी शेतकरी मैदानात; आटपाडीत प्रतिमेला दुग्धाभिषेक
Embed widget