एक्स्प्लोर

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न

Saif Ali khan: लिलावती रुग्णालयातील डॉ.निरज उत्तमानी आणि न्यूरोसर्जन डॉ.नितीन डांगे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.

मुंबई : बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान (Saif ali khan) रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर फीट अन् हसतमुख दिसून आला. आपल्या वांद्र येथील घरी परतल्यानंतर सैफने त्याच्या चाहत्यांना अभिनंदन केले. पांढरा शर्ट, निळी जिन्स आणि हसतमुख चेहरा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. सैफ अली खान एवढा तंदुरुस्त व फीट कसा असाही प्रश्न अनेकांना पडला. सोशल मीडियावर सैफचे घराबाहेरील फोटो व्हायरल झाले असून सैफवरील हल्ल्यावरच आता नेटीझन्सने शंका उपस्थित केल्या आहेत. त्यातच, आता शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गटातील नेत्यांनीही सैफ फीट व तंदुरुस्त असल्यावरुन वैद्यकीय उपचार आणि हल्ल्यासंदर्भाने शंका उपस्थित केली आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील सैफ अली खानच्या तंदुरुस्तीवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. 

लिलावती रुग्णालयातील डॉ.निरज उत्तमानी आणि न्यूरोसर्जन डॉ.नितीन डांगे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यावेळी, सैफ अली खानच्या मानेजवळील बाजुतून अडीच इंच चाकू बाहेर काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच, सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं होतं. त्यानुसार, पुढील दोन दिवसांत सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, सैफला डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर हसतमुख, काळा गॉगल परिधान केलेला तंदुरुस्त पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आता, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनीही सैफच्या प्रकृतीबाबत भाष्य करताना रुग्णालयातील डॉक्टर व सैफ अली खानच्या कुटुंबीयांनाच लक्ष्य केलंय. 

सैफ अली खान हल्ला प्रकरणी शिवसेना नेते संजय निरुपम यांच्याकडून लीलावती हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि सैफ अली खान कुटुंबीयांवर मोठा आरोप करण्यात आला आहे. लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी 6 तास ऑपरेशन केले आणि सैफ अली खानचा पाठीत मानेजवळ अडीच इंच चाकू घुसला असल्याची माहिती दिली. मात्र, लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी 5 दिवसात उपचार करून गंभीर जखमी असलेल्या सैफ अली खानला एवढा चांगला कसा काय केला, असा प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केला आहे. संजय निरुपम यांच्याकडून 16 जानेवारीच्या रात्री नेमकी काय घटना घडली, या संदर्भात सैफ अली खान यांच्या कुटुंबीयांनी आणि लीलावतीच्या डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे, अशी मागणीही करण्यात आलीय. 

मुंबईत 30 लाख बांगलादेशी

लीलावतीच्या डॉक्टर आणि पोलिसांच्या तपासावर शिवसेना नेते संजय निरुपम यांच्याकडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. सैफ अली खान हल्ला प्रकरणी विरोधकाकडून मुंबईत सेलिब्रेटी सुरक्षा नाही, येथील कायदा सुव्यवस्था खराब झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, संजय निरुपम यांनी हल्लासंदर्भातच प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, मुंबईत 30 ते 40 लाख बांगलादेशी घूसकोर असल्याच्या दावा देखील संजय निरुपम यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget