एक्स्प्लोर

4 January In History: जागतिक ब्रेल दिवस, केसरी वर्तमानपत्राची सुरुवात, पंचमदा यांचं निधन; इतिहासात आज

On This Day In History: आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. चार जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत.

On This Day In History :  आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. चार जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. महान भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ "आयझॅक न्यूटन" यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.  तर ब्रेल लिपीचे निर्माते लुई ब्रेल (Louis braille) यांच्या जन्मदिनानिमित्त चार जानेवारी हा जगभरात ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्याच दिवशी पुण्यात केसरी वर्तमानपत्राची सुरुवात झाली होती. त्याशिवाय इतिहासात अनेक घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. 

चार्ल्सचा पराभव (charles)
1641: आजच्याच दिवशी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याला पराभवाचा सामना करावा लागला होता. कर भरायला नकार देणार्‍या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी  पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला होता. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली होती. या युद्धामुळे चार्ल्सला पराभवाचा सामना करावा लागला. या युद्धामध्ये चार्ल्सचा शिरच्छेद करण्यात आला होता.

न्यूटनचा जन्म (Isaac Newton) -
1643: महान भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ "आयझॅक न्यूटन"  यांचा आजच्याच दिवशी 1643 मध्ये जन्म झाला होता. इंग्लंड मधील लिंकनशायर शहरातील वुलस्टोर्प येथे न्यूटन यांचा जन्म झाला होता. जगाच्या पाठीवर आजवर अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होवून गेले पण न्यूटन यांचासारखा नाही झाला. न्यूटन ने प्रकाश, गती आणि गणितात अनेक शोध लावले. न्यूटन ने सांगितले की पांढरा रंग इंद्रधनुष्यातील सात रंगांचे मिश्रण आहे. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत मांडला. एकदा न्यूटन झाडाखाली बसले होते, तेव्हा झाडावरून एक फळ खाली पडले. त्या फळाला हातात धरून ते विचार करू लागले की हे फळ खालीच का पडले? आकाशात का नाही गेले? त्यांनी ही गोष्ट अनेक लोकांना विचारली. व ते सांगू लागले की पृथ्वीवर कोणतीतरी शक्ती कार्यरत आहे, जी या फळाला खाली खेचत आहे. परंतु त्यांच्या या गोष्टीला कोणीही गंभीरपणे घेतले नाही. त्यानंतर त्यांनी अभ्यास करत  सूर्याच्या चारही बाजूंना फिरणाऱ्या ग्रहांच्या संबंधात गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितला.  

जागतिक ब्रेल दिवस आणि लुई ब्रेल यांचा जन्म (World Braille Day)- 
1809:  चार जानेवारी हा जगभरात ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक ब्रेल दिन हा अंध आणि दृष्टिबाधित व्यक्तींसाठी आणि त्यांच्या मानवी हक्कांची पूर्ण जाणीव करून देण्यासाठी साजरा करण्यात येतो. ब्रेल लिपीचे निर्माते लुई ब्रेल (Louis braille) यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस निडवण्यात आला आहे. लुई ब्रेल हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. त्यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत, लिपी विकसित केली. त्यांचा जन्म चार जानेवारी 1809 रोजी फ्रान्समध्ये झाला होता. 
 
लुई ब्रेल यांनी शोधलेली लिपी आज अनेक अंध व्यक्तींसाठी शिक्षणाचं माध्यम झाली आहे. ब्रेल यांच्या नावावरुन याला ब्रेल लिपी असं म्हटले जाते. 2019 पासून जगभरात चार जानेवारी हा दिवस जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 

केसरी वर्तमानपत्राची सुरुवात -
चार जानेवारी 1881 मध्ये लोकमान्य टिळक यांनी पुण्यात केसरी वर्तमानपत्राची सुरुवात केली होती. जनतेला स्वातंत्र्य चळवळीस उद्युक्त करावयासाठी व सामाजिक परिवर्तनासाठी टिळकांनी केसरी वर्तमानपत्र सुरु केले होते. केसरी वर्तमानपत्राचे पहिले  संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. त्यांनी 1889 पर्यंत संपादक म्हणून काम पाहिलं. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता झटक्यात वाढली. परंतु पुढे टिळक व आगरकर यांच्यातील वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे  'केसरी'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले. इंग्रज सरकारविरोधात टिळकांनी पाचशेपेक्षा जास्त अग्रलेख लिहिले होते. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? उजाडले पण सुर्य कुठे आहे? टिळक सुटे पुढे काय? यासारख्या मथळ्यासह टिळकांचे संपदकीय लेख वाऱ्यासारखे लोकांच्या मनात उतरले होते.  

1908 : राजारामशास्त्री भागवत यांचं निधन
आजच्याच दिवशी 1908 मध्ये राजारामशास्त्री भागवत यांचं निधन झालं होतं. विद्वान, समाजसुधारक, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र यांनी आयुष्यभर समाजाच्या हितासाठी काम केलं. त्यांचं शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिंदूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते. ११ नोव्हेंबर १८५१ रोजी रत्नागिरीतील  कशेळी, राजापूर येथे त्यांचा जन्म झाला होता. 

काकोरी खटल्याला सुरुवात -
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही काकोरी घटनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याच काकोरी खटल्याला आजच्याच दिवशी 1926 मध्ये लखनौ येथे सुरुवात झाली होती. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात क्रांतिकारी पार्टीसाठी पैसा जमा करण्यासठी लखनौ जवळच्या काकोरी येथे सर्व क्रांतिकारक जमा झाले. 9 ऑगस्ट 1925 च्या रात्री काकोरी आणि आलमनगर रेल्वे स्थानकादरम्यान सहारनपूर लखनौ एक्स्प्रेसमधील इंग्रजांचा सोने- चांदीचा खजिना लुटण्यात आला. अवघे दहा पंधरा क्रांतिकारक विरुद्ध इंग्रज असा सामना झाला होता. या काकोरी कटात सहभागी असल्यामुळे  भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामातील राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने 1927 मध्ये फाशी दिली होती.

निरुपा रॉय यांचा जन्म -
आजच्याच दिवशी 1931 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री निरुपा रॉय यांचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. निरुपा रॉय यांनी सुरुवातीच्या काळात ग्लॅमरस भूमिका केल्या. मात्र, त्यांनी साकारलेले आईचे पात्र लोकांच्या हृदयात इतके रुजले की, त्यांना थेट 'मदर ऑफ बॉलिवूड' अशी पदवीच देण्यात आली. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात निरुपा रॉय यांनी आईची भूमिका साकारली आहे. निरुपा रॉय यांनी मराठी चित्रपटापासून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये काम केले. त्यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या आहेत. निरुपा रॉय यांनी त्यांच्या 5 दशकांच्या दीर्घ बॉलिवूड करिअरमध्ये जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले. निरुपा रॉय यांचं वयाच्या 73 व्या वर्षी 13 ऑक्टोबर 2004 रोजी निधन झालं.

नेहरु आणि गांधींना अटक -
1932: सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांना दोन वर्षांची शिक्षा  झाली. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरु झाली होती.  भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाच्या चळवळीपैकी एक चळवळ म्हणून याला ओळखलं जातं. 1932 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे वायसराय विलिंगडन यांनी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना अटक केली होती.  

श्रीकांत सिनकर यांचा जन्म - 
रहस्यकथा लेखक श्रीकांत सिनकर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1940 मध्ये झाला. गुन्हेगारीवरील आणि विशेषतः गाजलेल्या गुन्ह्यांच्या पोलिसांनी केलेल्या तपासावरील कथा हा सिनकरांचा हातखंडा राहिलाय. मराठी भाषेत पोलिस तपासावर आधारीत कथा रुजवण्याचं बरंचसं श्रेयं हे सिनकरांचं आहे. दूरदर्शनवर प्रदर्शित झालेल्या 'एक शून्य शून्य' आणि 'शोध' या पहिल्यावहिल्या डिटेक्टीव्ह मालिकांना आधार सिनकरांच्या तपासकथांचाच होता. सिनकर यांनी सैली १३ सप्टेंबर यासारख्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

कल्पनाथ राय यांचा जन्म -
आजच्याच दिवशी 1941 मध्ये काँग्रेस नेते कल्पनाथ राय यांचा जन्म झाला होता. कल्पनाथ राय यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिलेय. कल्पनाथ राय तीन वेळा लोकसभा तर चार वेळा राज्यसभा खासरादर राहिलेत. सहा ऑगस्ट 1999 मध्ये कल्पनाथ राय यांचं दिल्ली येथे निधन झालं होतं. 

म्यानमारला स्वातंत्र्य -
आजच्याच दिवशी 1948 मध्ये म्यानमारला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं. म्यानमारला ब्रह्मदेश म्हणूनही ओळखलं जायचं. पण लष्करी प्रशासनाने देशाचे नाव बदलून ‘रिपब्लिक ऑफ दी युनियन ऑफ म्यानमार ’ असे केले. बर्मी म्यानमारची भाषा आहे. म्यानमारच्या ईशान्येस चीन, पूर्वेस लाओस, आग्नेयेस थायलंड, पश्चिमेस बांग्लादेश, वायव्येस भारत हे देश असून नैऋत्येस बंगालचा उपसागर आहे.  

‘बगान’ हे म्यानमारचे सांस्कृतिक राजधानीचे ठिकाण आहे.. म्यानमारमध्ये जिकडे बघावे तिकडे लहान-मोठे पॅगोडाच पॅगोडा आहेत. म्यानमार हा आशिया खंडातील सर्वात गरीब देश म्हणून ओळखला जातो. आशियामधील सर्वात मोठा सुवर्ण पॅगोडा म्हणजे ‘श्वेडगॉन पॅगोडा’ येथे आहे. 

1960 : अल्बर्ट कामू यांचं निधन - ( French novelist and playwright Albert Camus) 
नोबेल पुरस्कार विजेते फ्रेंच कादंबरीकार अल्बर्ट कामू याचा कार अपघातात मृत्यू..  त्यांची दी स्ट्रेंजर किंवा दी आऊटसायडर ही कादंबरी सर्वाधिक लोकप्रिय आणि अभिजात दर्जाची मानली जाते. 

आदित्य पंचोलीचा जन्म - 
चार जानेवारी 1965 रोजी बॉलिवूड अभिनेता आदित्य पंचोलीचा जन्म झाला. आदित्यचे शालेय शिक्षण मुंबईतील जुहू येथील सेंट जोसेफ हायस्कूलमधून झाले. अभिनेता आदित्य पांचोलीचे खरे नाव निर्मल पांचोली आहे. आदित्य पंचोली याने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात काम केलेय. पण प्रमुख भुमिकेत आदित्यला प्रेक्षकांनी फारशी पसंती दिली नाही, त्यामुळे दुय्यम भूमिका त्याच्या वाट्याला आल्या. आदित्य त्याच्या अभिनयापेक्षा कॉन्ट्रव्हर्सिजमुळेच सर्वाधिक चर्चेत राहिलेला आहे. काही वर्षांपूर्वी 'लाखों हैं यहां दिलवाले' या सिनेमाच्या सेटवर त्याने को-स्टार विजे भाटियाला मारले होते. याआधी एका फाइव्हस्टार पबमध्ये मारहाण करण्याचा त्याच्यावर आरोप होता. त्याशिवाय कंगनासोबतच्या अफेअरच्याही चर्चा रंगल्या होत्या.

पाकिस्तानात रेल्वे अपघात -
आजच्या दिवशी 1990 मध्ये पाकिस्तानमध्ये सर्वात मोठी रेल्वे दुर्घटना घडली होती. चार जानेवारी 1990 मध्ये पाकिस्तानमध्ये दोन रेल्वे समोरासमोर एकमेंकांना धडकल्या होत्या. या भीषण अपघातामध्ये 300 पेक्षा जास्त प्रवाशांना जीव गमावाला लागला होता. तर 600 पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले होते. या अपघाताला तीस वर्षापेक्षा जास्त काळ उलटला आहे. 

आरडी बर्मन यांचं निधन - 
आरडी बर्मन अर्थात पंचमदा यांचं आजच्याच दिवशी 1994 मध्ये निधन झालं होतं. 70-80 च्या दशकात आरडी बर्मन बॉलीवूडमध्ये सर्वाधिक नाव मिळवणारे संगीत दिग्दर्शक होते. आरडी बर्मन यांची गाणी आजही प्रेक्षकांना आवडतात. आरडींनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पहिलं गाणं संगीतबद्ध केलं होतं. आणि बॉलिवूडमध्ये अवघ्या 17 व्या वर्षी पाऊल टाकलं होतं. तिसरी मंजिल, अमर प्रेम, आंधी, परिचय, मासूम, शोले, खेल खेल में, आप की कसम, किनारा आणि 1942 लव स्टोरी अशा सिनेमातील गाण्यांना संगीतबद्ध केलं आहे.

जगाला मिळाली सर्वात उंच इमारत -
आजच्याच दिवशी 2010 मध्ये दुबईत जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाचं उद्घाटन झालं होतं. बुर्ज खलिफाची उंची 828 मीटर आहे.  2004 पासून याचं बांधकाम सुरु होतं. या इमारतीला तयार करण्यासाठी 1.10 लाख टन कॉन्क्रीट आणि 55 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. 

बुर्ज खलीफा इमारतीत 163 फ्लोअर आहेत. याच्या 76 व्या फ्लोअरवर जगातील सर्वात उंच  स्वीमिंग पूल  आहे तर  158 व्या मजल्यावर मस्जिद आहे. 144 व्या फ्लोअरवर नाइटक्लब आहे.  इमारतीला तयार करण्यासाठी दररोज १२ हजार कामगार काम करत होते. इमारतीच्या टॉप फ्लओअरचं तापमान पहिल्या मजल्यापेक्षा खूप कमी राहते. इमारतीत घर आणि ऑफिससाठी जागा घेण्यासाठी जगभरातील श्रीमंतांमध्ये स्पर्धा लागली. समुद्राच्या काठावर वसलेली ही सुंदर वास्तू पाहण्यासाठी पर्यटकही मोठ्या संख्येने येतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget