RBI on Notes Denomination : दोन हजारच्या नोटा चलनातून हद्दपार होणार? गेल्या वर्षीपासून छपाई बंद
2000 च्या नोटा चलनात आल्यापासूनच या नोटांविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. परंतु रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 च्या नोटा चलनातून बाहेर गेल्याचे अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही

नवी दिल्ली : मोदी सरकारने 2016 रोजी नोटबंदीसंबंधी मोठा निर्णय घेतला होता. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी सरकारने 500 रूपयाच्या आणि एक हजाराच्या नोटांचे व्यवहार थांबविले होते.तर 500 रूपये आणि दोन हजाराच्या नवीन नोटा व्यवहारात आणल्या होत्या. परंतु मागील दोन वर्षांपासून दोन हजाराच्या नोटा छापणं थांबवण्यात आल्याचे रिझर्व बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुरुवारी सांगितले. दरम्यान 20 रुपयांच्या नोटांची छपाई वाढवण्यात आली आहे.
आरबीआयने 2019-20 या वर्षात 20 रुपयांच्या 13,390 लाख नोटा आणि 2020-21 या वर्षात 38,250 लाख नवीन नोटा छापल्या आहेत. तर 2018-19 या वर्षात 2000 च्या 467 लाख नोटा बाजारात आणल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून 2000 च्या नोटा छापल्या गेलेल्या नाहीत. अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते की, मागील दोन वर्षांपासून दोन हजाराच्या नोटा छापणं थांबवण्यात आले आहे. नोटा छापण्यापूर्वी आरबीआय आणि सरकार एकमेकांसोबत चर्चा करून नोटा छापण्याचा निर्णय घेत असतात. पण 2019-20 आणि 2020-21 मध्ये एकही नोट छापण्याची सूचना मिळाली नाही.
प्रत्येकवर्षी कमी होत गेली छपाई
2016 मध्ये 2000 च्या नोटा चलनात आल्यापासूनच या नोटा छापणं कमी होत गेलं. आरबीआयच्या मते आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 354 करोड दोन हजारच्या नोटा छापल्या गेल्या होत्या. त्यानंतर आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 11.15 करोड दोन हजारच्या नोटा छापल्या गेल्या. तर 2018-19 मध्ये 4.669 करोड दोन हजाराच्या नोटा छापल्या गेल्या आहेत. त्यानंतर एप्रिल 2019 नंतर आतापर्यंत दोन हजारच्या नोटा छापल्या गेलेल्या नाहीत.
2000 च्या नोटा चलनात आल्यापासूनच या नोटांविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. परंतु आरबीआयने 2000 च्या नोटा चलनातून बाहेर गेल्याचे कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु केंद्रीय बँकने 2000 च्या नोटा छापण्याचे बंद केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही बँकेकडे 2000 च्या नोटा पोहचल्या नाही त्यामुळे लोकांना देखील एटीएममधून पैसे मिळाले नाही. अनेक अभ्यासकांच्या मते, 2000 च्या नोटेचे मूल्य जास्त असल्यान त्याचा उपयोग ब्लॅक मनी आणि आर्थिर गैरव्यहारासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. आरबीआयच्या देखील ही बाब लक्षात आल्यानंतर नवीन नोटांची छपाई बंद केली आणि चलनात असलेल्या नोटा मागे घेण्यास सुरुवात केले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
